एक्स्प्लोर

Pradip Kurulkar : प्रदीप कुरुलकरांचे कारनामे! पाकिस्तानी महिलेसोबत अश्लील चॅटिंग अन् भारतातील महिलांचं लैंगिक शोषण; कुरुलकरांच्या चार्जशीटमध्ये नेमकं काय?

पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप असलेले डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी डीआरडीओतील कामाची कंत्राटे देताना दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याच समोर आलं आहे.  

Pradip Kurulkar :  पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप असलेले डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी डीआरडीओतील कामाची कंत्राटे देताना दोन महिलांचे लैंगिक शोषण केल्याच समोर आलं आहे.  एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळं प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.  

डीआरडीओचे संचालक असताना प्रदीप कुरुलकरांनी घातलेले एक ना अनेक उद्योग आता समोर येऊ लागले आहे. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र मोहिमांची गोपनीय माहिती दिल्याचा आरोप तर आहेच पण याच कुरुलकरांनी  डीआरडीओचे संचालक असताना दोन महिलांचं लैंगिक शोषण केल्याचंही समोर आलं आहे. डीआरडीओचे संचालक असताना  डीआरडीओच्या कॅम्पसमधील वेगवगेळ्या कामांची कंत्राटं देण्याचे अधिकार प्रदीप कुरुलकरना होते. मात्र ही कंत्राटं देताना त्यांनी दोन महिलांचं  डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये लैंगिक शोषण केलं आणि त्यानंतर त्यांना कंत्राट दिल्याचं पीडित महिलांनी दिलेल्या जबानीत म्हटलं आहे. 

सीसीटीव्ही फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर

एटीएसने प्रदीप कुरुळकरना अटक करून जेव्हा तपास सुरु केला तेव्हा कुरुलकरांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप चाट आढळून आले . कुरुलकरांनी मागील वर्षभरात जिथे जिथे प्रवास केला होता तिथे ए टी एस ने तपास केला. या तपासत मुंबईतील कलिना इथल्या गेस्ट हाऊसमध्ये कुरुलकर वेगवेगळ्या सहा महिलांना भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं. या महिलांचा माग काढत एटीएसने त्यांची चौकशी केली असता त्यापैकी दोन महिलांनी कुरुलकरांनी लैंगिक शोषण केल्याचं एटीएसला सांगितलं आहे.

बाकी  पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या जाळ्यात कां नाही अडकले ? कुरुलकरच का अडकले?

प्रदीप कुरुलकर झारा दास गुप्ता या बनावट नावाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून चालवल्या जाणाऱ्या हनी ट्रॅपमध्ये अडकले. पण त्या आधी डीआरडीओचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी अनेकांना ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. डीआरडीओच्या वर्तुळात कुरुलकरांची एक रंगेल अधिकारी अशीच प्रतिमा तयार झाली होती. या सर्व गोष्टींची आणि कुरुलकरांच्या सवयींची माहिती काढून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेंनी कुरुलकरांना जाळ्यात अडकवायचं ठरवलं. इतर कोणता अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या जाळ्यात कां नाही अडकले ? कुरुलकरच का अडकले? याच उत्तर कुरुलकरांच्या या सवयींमध्ये दडलं आहे. 

हनी अन् बेब...

झारा दास गुप्ताने क्षेपणास्त क्षेत्रात अभ्यास करणारी एक विद्यार्थिनी म्हणून प्रदीप कुरुलकरांशी संपर्क केला. तुम्ही मला डॉक्ट्रेट मिळवण्यासाठी मार्गदर्शन करा, अशी विनंती तिनं कुरुलकरांना केली. पुढे दोघांमध्ये क्षेपणास्त्र मोहिमेबरोबरच खाजगी विषयांवर देखील संवाद सुरु झाला. पुढे तो एकमेकांना बेब आणि हनी म्हणण्यापर्यंत पोहचला. एकीकडे लंडनमध्ये बसलेल्या झारा दास गुप्ताशी कुरुलकरांचं असं चॅटिंग सुरु होतं तर दुसरीकडे इथे भारतात त्याच काळात कुरुलकर सहा वेगवगेळ्या महिलांना डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये भेटत होते. 

 राष्ट्रीय सुरक्षेच्या अंगाने जाणारा तपास

कुरुलकरांना अटक केल्यानंतर त्यांनी कोणती गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला दिली आहे आणि ते त्यासाठी कोणाला भेटलेत याचा तपास एटीएसने सुरु केला. हा तपास राष्ट्रीय सुरक्षेच्या अंगाने जाणारा होता. मात्र या तपासात करुळकरांच्या व्यक्तिमत्वाची रंगीबेरंगी अंग उघडी होऊ लागली. मात्र दुर्दैव हे की भारतीय सैन्यदलांसाठी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या, क्षेपणास्त्र मोहिमांची आखणी करणाऱ्या डीआरडीओसारख्या नामवंत संस्थेच्या आवारात हे प्रकार घडत होते. आपण किती महत्वाच्या संस्थेचं नेतृत्व करतो आहोत याचं कुरुलकरांचं भान सुटलं होतं हेच यातून स्पष्ट झालं आहे. 

हेही वाचा-

Pradip Kurulkar : आधी गुरु-शिष्य मग थेट 'हनी अन् बेब'; प्रदीप कुरुलकरांच्या Whatsapp चॅटमध्ये काय काय सापडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget