एक्स्प्लोर

Pune Crime News : बंदोबस्तावरील महिला पोलिसाला मारहाण; आठवड्याभरातील दुसरी घटना

पुण्यात पोलिसांना मारहाण करण्याचं सत्र संपत नसल्याचं चित्र आहे. कार्तिकी एकादशीसाठी बंदोबस्त करत असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Pune Crime news: पुण्यात पोलिसांना (Pune Crime) मारहाण करण्याचं (Police) सत्र संपत नसल्याचं चित्र आहे. कार्तिकी एकादशीसाठी बंदोबस्त करत असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त रस्ता बंद असल्याचं महिला पोलीस दोघांना सांगत होत्या. त्यावेळी दोन जणांनी भरगर्दीत त्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 40 वर्षीय महिला पोलिसाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण जैन आणि दत्तात्रय कोकरे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. 40 वर्षीय महिला पोलीस कार्तिकी एकादशीनिमित्त बंदोबस्त करत होत्या. एकादशीला प्रचंड गर्दी असल्याने दरवर्षी काही रस्ते बंद करण्यात येतात. देहू फाटा चौकातून आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जाणारा रस्ता यात्रेमुळे बंद करण्यात आला होता. या मार्गावर कोणत्याही वाहनाला प्रवास करण्यासाठी परवानगी नव्हती. दरवर्षी लाखो भाविक आळंदीत दाखल होतात. त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात येतो.

याचदरम्यान दोन दुचाकीस्वारांनी बंद करण्यात आलेल्या रस्त्यावरुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्याने वाद घालत होते. हा वाद टोकाला गेला आणि दोघांनी महिला पोलिसाच्या तोंडावर फटका मारला. या महिला पोलिसाला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील दोघांनी मारहाण केली. अखेर नागरिक या वादात पडले आणि आरोपी असलेल्या दोघांना मारहाण केली. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांची गाडी झाडाला धडकली आणि नागरिकांनी आरोपी दोघांना पोलिसांच्या हवाली केले. 

अलका टॉकिज परिसरात महिला पोलिसाला मारहाण

चार दिवसांपूर्वीच अलका टॉकिज चौकात असाच प्रकार घडला होता. अश्लील शिवीगाळ करुन महिला पोलिसाला चपलेने मारहाण करण्यात आली होती. माझी गाडी का उचलली, याचा जाब विचारत त्या महिला पोलिसाला महिलेनेच जबर मारहाण केली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. महिला पोलिसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महिलेला अटक करण्यात आली होती. सीता रमेश पुजारी (वय 35 वर्षे, रा. ताडीवाला रोड) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. वाहतूक पोलिसांनी एका महिलेची गाडी उचलली होती. अलका टॉकिज परिसरात हा प्रकार घडला आहे. माझी गाडी का उचलली असा जाब त्या महिलेने पोलीस महिलेला विचारला होता. त्यावेळी पोलीस महिलेने माझी पोस्टिंग या परिसरात नाही त्यामुळे मला याबाबत माहिती नाही," असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे महिला पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget