Pune Crime News : राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), श्वेता महाले (Shweta Mahale), मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar), देवयानी फरांदे (Devayani Farande) या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कसून चौकशी करत आहेत. 


आई आजारी असल्याचं सांगत एका अज्ञात व्यक्तीनं आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे फोनवरून पैशाची मागणी केली. त्या नंतर मिसाळ यांनी 4300 रुपये ऑनलाईन पाठवले. Google pay च्या माध्यमातून हे पैसे त्या व्यक्तीला त्यांनी पाठवले. मात्र तो फेक कॉल असल्याचं कळताच आमदार माधुरी मिसाळ यांनी तक्रार दिली. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरु केली. 


भाजपच्या बाकी महिला आमदारांना देखील अशा प्रकारचे फोन आले असल्याचं उघड झालं, त्यात आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांचा समावेश आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीनं या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आई आजारी असल्याचं कारण देत या व्यक्तीनं महिला आमदारांकडून पैसे उकळले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, याप्रकरणी पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमातून हे पैश्यांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :