Shrikant Deshmukh Pune:  सोलापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  लैंगिक शोषण आणि फसवणुकीचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पीडित महिलेने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पुण्यातील डेक्कन भागातील हॉटेलमधे माझ्याशी लग्न केलं आहे. माझ्या जीवाला धोका आहे, असे धक्कादायक खुलासे पीडितेने केले आहेत.


श्रीकांत देशमुखन आणि मी 2009 पासून एकमेकांना ओळखत आहोत. पण 2021 पासून आमच्यामधे संबंध आले.
श्रीकांत देशमुख यांनी पुण्यातील डेक्कन भागातील हॉटेलमधे माझ्याशी लग्न केलं आहे . त्याचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत.  मी भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता आहे, असा खुलासा पीडितेने केला आहे.


 मी माझ्यावर झालेला अन्याय आधी पक्षाच्या लोकांच्या कानावर घातला. मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पैसै घेऊन हे प्रकरण मिटविण्यासाठी माझायावर दबाव आणला. चित्रा वाघ यांच्याकडेही मी हा प्रकार सांगितला.  त्यांनी मला भेटायला मुंबईला त्यांच्या कार्यालयात बोलावलं होतं. पण पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


माझ्या पक्षाकडून मला न्यायाची अपेक्षा आहे.  त्यासाठी मला देवेंद्र फडणवीस यांना भेटायची इच्छा आहे. श्रीकांत देशमुख यांच्याकडे लग्नाची मागणी करु लागल्याने माझ्याविरुद्ध हनी ट्रॅपचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत देशमुख आणि मी नातेवाईक आहोत. त्यांचे वडील आमच्या घरी येऊन गेले आहेत आम्ही आमच्या पातळीवर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच तोडगा निघाला नाही. आता मात्र माझ्या जीवाला धोका आहे, असंही म्हणत पीडित महिलेने न्यायासाठी याचना केली आहे.


भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता.