पुणे : पुण्यातील (Pune Crime News)  वाघोली येथील  एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने  लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो (POCSO)   अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पिडीत मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे . अत्याचाराबाबत कोणाला  काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगा घाबरला होता.  


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 10 वर्षीय मुलगा हा वाघोलीमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेत आहे. 19 एप्रिल रोजी फिर्यादी यांनी मुलाला  शाळेमध्ये सोडल्यानंतर आरोपीने पिडीत मुलाला त्याचे नाव विचारले. त्याच्याशी गोड बोलून त्याला 'तू चित्रपट आवडतात का?'असे विचारले. पीडित मुलाने हो उत्तर दिल्यानंतर आरोपीने टॉयलेटमध्ये चल... मी तुला एक फिल्म दाखवतो असे म्हटले.  पिडीत मुलाने त्यांना नकार दिला. मात्र आरोपीने 'इथले सगळे कॅमेरे बंद आहेत तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही" असं सांगितलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागले.


पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


आरोपीच्या या कृतीला घाबरून पिडीत मुलगा पळून गेला. थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गात येऊन "तुला इथेच फिल्म दाखवतो" असे बोलून त्यांनी मोबाईल मध्ये एक अश्लील वेबसाईट दाखवली आणि कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली.  पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणी पॉक्सो केलं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


हे ही वाचा :


आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदामध्ये मी स्पीडब्रेकर होतो असा ठाकरेंचा समज होता, त्यामुळेच त्यांनी घाई केली : एकनाथ शिंदे