मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi)   सरकारमध्ये खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray)  खात्यात खूप हस्तक्षेप होता. राज्यसभा उमेदवार निवडीत बाजूला ठेवून कहर केला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत एकनाथ शिंदेंनी  यांनी इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत  केला आहे.  आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे उद्धव ठाकरेंना  वाटत होते त्यामुळेच त्यांनी घाई केली असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 


एकनाथ शिंदे म्हणाले,   महाविकास आघाडी सरकार काळात मला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. खात्याचा मंत्री असताना   आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यात खूप हस्तक्षेप होता.  मला कधीही स्वतंत्रपणे काम करू दिले गेले नाही. आदित्य ठाकरे कायमच ढवळाढवळ करत होते.  नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकांना ते उपस्थित राहायचे.  नगरविकास खाते काढून घेण्याचा ठाकरेंचा डाव होता. 


राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकरेंनी कहरच केला, मग माझा संयम सुटला : उद्धव ठाकरे


एकनाथ शिंदे म्हणाले,  महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्ष फुटण्यापूर्वी ठाकरे त्यांच्याकडून नगरविकास खाते हिसकावून घेण्याचा विचार करत होते, आदित्य ठाकरे यांच्याकडून सतत अपमान केला जात होता. मला नक्षलवाद्यांकडून धोका होता. अनेक वेळा धमक्या देखील मिळाल्या होत्या.  नक्षलवाद्यांचा धोका असूनही मला Z+ आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात मी अडथळा ठरेन, असे त्यांना वाटत होते. आदित्य ठाकरे यांच्याकडून सतत अपमान केला जात होता. मंत्री असून देखील वर्षावर बोलावून ताटकळत ठेवलं जात होतं. राज्यसभेच्या निवडणुकीत तर कहरच केला. राज्यसभेचा उमेदवार ठरवताना मला सहभागी करून घेतलं नाही या प्रक्रियेपासून दूर ठेवले तेव्हा माझा संयम सुटला.  


उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर अनेक गौप्यस्फोट


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते, असा दावा शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्रीपदासाठी (Chief Minister) मार्गदर्शन करणार आणि नंतर मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असं फडणवीस म्हणाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.  त्यानंतर एकामागो माग गौप्यस्फोटांची मालिका सुरू झाली आहे.  


हे ही वाचा :


Eknath Shinde: भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा