पुणे : पाण्याच्या टाकीमध्ये (Water Tanker) महिलेचा मृतदेह (Dead Body) सापडल्याची धक्कादायक घटना पु्ण्यातूल समोर आली आहे. एकीकडे पुणे पोर्शे कार अपघात (Pune Porsche Accident Case) प्रकरण चर्चेत असून अपघातांचं सत्रही (Pune Accident Case) कायम असल्याची पाहायला मिळत आहे. असं असताना आता पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. यामुळे पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


पाण्याच्या टँकरमध्ये सापडला महिलेचा मृतदेह


पुण्यातील हडपसर येथील ही धक्कादायक घटना समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे. पुण्याच्या हडपसरमधील फुरसुंगी परिसरातील पावर हाऊस हरपळे वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकरमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढला.


पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंच


घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने टँकरमधील पाणी खाली करून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. पाण्याच्या टँकरमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. टँकरमध्ये सापडलेला मृतदेह महिलेचा असून हा मृतदेह कोणाचा आणि त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिस पुढील तपास पोलीस करत आहेत. टँकरमध्ये मृतदेह सापडल्याची घटना आजूबाजूला वाऱ्यासारखी यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं.




मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु


महिलेचा मृतदेह पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये आढळल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. हा टँकर कुणाचा आहे, कुठून आला, हा मृतदेह कुणाचा, असे विविध प्रश्न निर्माण झाले असून परिसरामध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हरपळे वस्ती परिसरातील महागणपती मंदिराच्या जवळ उभ्या असलेल्या टँकरमध्ये हा महिलेचा मृतदेह आढळला असून या ठिकाणी ये-जा करणारा रस्ता अरुंद आणि खड्डेमय असल्यामुळे पोलीस प्रशासनाला तो टँकर त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तपास करावा लागला.