एक्स्प्लोर

VIDEO | पाण्यासाठी झुंबड, कोरोनाच्या संकटकाळात पुण्यातील जीवघेणा प्रकार

महाराष्ट्रात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे.

पुणे: पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. असं असताना पुण्यातील उरुळी देवाची इथं पाण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. एप्रिल महिन्यातच या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं इथं पाण्याचे टॅंकर सुरु करण्यात आले आहेत. फुरसुंगी परिसरातील उरुळी देवाची इथं पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यामुळं उडालेला पाहायला मिळाला. या व्हिडीओत दिसत आहे की, लोक पाण्याच्या टॅंकरच्या भोवती पाण्यासाठी झुंबड करत आहेत.  पाणी घेण्यासाठी स्त्री-पुरुष आबालवृद्ध टँकर भोवती जमा झाले आहेत. अनेकांनी मास्क न लावता पाण्यासाठी टँकरला गराडा घातला आहे. सोशल डिस्टन्सचा फज्जा तर उडालाच मात्र कोरोनाव्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची ऐसीतैसी झालेली यानिमित्ताने पाहायला मिळालं. यामुळं कोरोना प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी आणखी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. पुणे जिल्ह्यात 19 कोरोनाबाधित आहेत. तर पुणे मनपा क्षेत्रात 734 कोरोनाबाधित आहेत. यापैकी 54 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुणे पोलीस दलातही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला असून तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी फरासखाना पोलीस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह सापडले. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. पोलीस दलातील तिघांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड 
उमेश पाटील माझ्या नादाला लागू नका, पार्थ पवारांचे कान भरणे बंद करा, आमदार विक्रम काकडेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उघड 
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Embed widget