एक्स्प्लोर

Pune Bypoll election :  कसबा-चिंचवडमध्ये महविकास आघाडीचं टेन्शन वाढलं; 'हे' दोन तगडे नेते करणार बंडखोरी

Pune Bypoll election: चिंचवडमध्ये सगळ्यांचे लोकप्रिय आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले राहुल कलाटेदेखील बंडखोरी करण्यावर ठाम आहे. 

Pune Bypoll election :   कसबा  (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (chinchwad bypoll election) मतदार संघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. दोन्ही मतदार संघात दोन तगडे नेते बंडखोरी करणार आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कसबा मतदार संघात महाविकास आघाडीची उमेदवारी कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना घोषित करण्यात आली आहे. या दोघांना उमेदवारी दिल्याने कसब्यात कॉंग्रेसचे तगडे नेते बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर चिंचवडमध्ये सगळ्यांचे लोकप्रिय आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेले राहुल कलाटेदेखील (Rahul kalate) बंडखोरी करण्यावर ठाम आहे. 

कसब्यात कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर बंडखोरी करणार

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.  मोदी गणपतीपासून बाईक रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करत कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.  एकीकडे टिळकांना उमेदवारी न दिल्याने हिंदू महासंघ पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवार घोषित केल्याने कॉंग्रेसचे नेते बंडखोरी करणार आहेत. 

राहुल कलाटे करणार बंडखोरी

त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. सुरुवातीपासून  ही जागा राहुल कलाटेंनाच मिळण्याची दाट शक्यता होती. त्या प्रमाणे कार्यकर्तेदेखील कामाला लागले होते. मात्र ऐनवेळी ही जागा महाविकास आघाडीने राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना घोषित केली. त्यामुळे राहुल कलाटे मोठं शक्ती प्रदर्शन करत बंडखोरी करणार आहे. आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. राहुल कलाटे यांनी 2019 मध्येही बंडखोरी केली होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी दोघांमध्ये अटीतटीची निवडणूक झाली होती. यावेळीदेखील निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. जनता माझ्या पाठीशी, माझ्याबाजूने जनतेची सहानुभूती आहे. माझ्यासारख्या उमेदवाराला संधी मिळावी म्हणून जनता मला संधी देईल. असा विश्वास बंडखोरीच्या तयारीत असलेल्या राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे. राहुल कलाटे यांच्या बंडखोरीमुळे चिंचवडची निवडणूक रंजक घडामोडी बघायला मिळणार आहे.

भाजपकडून टिळकांना डावललं तर जगताप कुटुंबियांना न्याय

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीकरीता भाजपकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीकरीता भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget