एक्स्प्लोर

Indrayani River Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर, चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद Video

Pune Bridge Collapse : पुण्यातील मावळमध्ये कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जण वाहून गेले होते त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुणेपुण्यातील मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पादचारी पूल कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत  38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आमदार सुनील शेळके यांनी याबाबत माहिती दिली आहे. नदी पात्रात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं आहे.  6 जणांवर आयसीयूत उपाचर सुरु आहेत. तर,30 ते  32 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. पूल कोसळल्यानंतर पर्यटक वाहून जात असल्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. 

पर्यटक वाहून जातानाचा नवा व्हिडिओ समोर 

कुंडमळा येथील पूल कोसळल्यानंतर 20 ते 25  पर्यटक वाहून गेले असावेत अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. प्राथमिक अंदाजानुसार काही जण वाहून गेले होते. या दाव्याची पुष्टी करणारा व्हिडिओ समोर आला आहे. नव्यानं समोर आलेल्या व्हिडिओत चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला पर्यटक मोठ्या संख्येनं असल्याचं पाहायला मिळतं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. कुंडमळा येथील पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.  लोकांना दुसरा पर्याय नसल्यानं या ठिकाणी लोकांकडून दुचाकीचा वापर करण्यात येत होता. काही वर्षांपूर्वी पूल धोकादायक झाल्यानं दुचाकीसाठी वापर बंद करण्याबाबतचा फलक लावण्यात आला होता. मात्र, त्याचा वापर सुरुच होता. हा पूल  शेलारवाडीतील दोन मळे शेलार मळा आणि भेगडे मला यांना जोडणारा होता. 

गेल्या दोन तासांपासून बचाव कार्य सुरु आहे. जी लोकं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेली आहेत, त्यांना वाचवण्यात आलं आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बचावकार्य अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्यानं पुलाचा कोसळलेला भाग उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र पुलाचं लोखंड अधिक वजनदार असल्यानं क्रेनकडून पुलाचा भाग उचलण्यास अपयश येत आहे. घटनास्थळी दोन क्रेन दाखल झाल्या असून त्याद्वारे पूलाचा कोसळलेला भाग उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

लोकप्रतिनिधी घटनास्थळी 

मावळचे आमदार सुनील शेळके या घटनेची माहिती मिळताच तातडीनं दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेतील 6 जखमींवर आयसीयूत उपचार सुरु आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Pune Jamavbandi: पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
पुण्यात आज मध्यरात्रीपासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, कारणही आलं समोर
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget