मोठी बातमी! भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस कंट्रोल रूमला फोन
Mla Mahesh Landge Death Threate: पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचं सांगत लांडगे यांना दिली जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मोशी मधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं आहे.
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांची सुपारी मिळाल्याचं सांगत लांडगे यांना दिली जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मोशी मधील तरुणाला या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं आहे. उदय कुमार राय असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Mla Mahesh Landge Death Threate)
भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका तरूणाने पिंपरी चिंचवड पोलिस कंट्रोल रूमला फोन करत मला महेश लांडगे यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे, अशी माहिती दिली. या प्रकरणात एकाला अटक केला आहे, त्याच्यावर भोसरीत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्यांदा ही धमकी मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याआधी देखील मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांना याआधी देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. अज्ञात आरोपीने मेसेज करून 30 लाखांची खंडणी मागत त्यांना धमकी दिली होती. महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांनी भोसरी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरु केलेली होती. नागरीक या हेल्पलाईन नंबरवर व्हाट्सअॅपवर आपली तक्रार पाठवात किंवा मदत लागली तर सांगत असे. याच हेल्पलाईनवरून महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या
काही दिवसांपुर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली आहे. वनराज आंदेकर (Vanraj Andekar) हत्याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात (Pune Crime News) गेल्या रविवारी रात्री वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्याने वार करुन हत्या केली होती. वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला असून कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे शहरात दहशत निर्माण झालेली आहे, अशातच महेश लांडगे यांना धमकी मिळाल्याने चर्चा सुरू झाली आहे.