एक्स्प्लोर

पाऊस पडला, धरणातील पाण्याचा लोंढा आला; दौंडच्या भीमा नदीवरचा पूलाचा महाकाय गर्डर खांबासकट कोसळला

दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड गार गावादरम्यान पुलाचं काम सुरू होतं. 20 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होतं मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळले आहेत. 

 पुणे : दौंड (Daund)  तालुक्यात काल रात्री नव्याने सुरु असलेल्या भीमा नदीवरील (Bhima River Bridge)  पुलाचे खांब कोसळले आहेत. दौंड आणि नगर (Daund - Ahmednagar)  जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू होते. या पुलाचे खांब कोसळले आहेत.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड गार गावादरम्यान पुलाचं काम सुरू होतं. 20 कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होतं मात्र पूल उभारण्याचं काम सुरू असताना पुलाचे खांब कोसळले आहेत. 

दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गार आणि दौंड आणि गार या दोन गावांना जोडणारा या पुलाचे काम सुरू असून उन्हाळ्यात भीमा नदी ही पूर्ण कोरडी होती परंतु गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे आणि धरणातून देखील थोडेफार पाणी नदीला सोडण्यात आले आहे. काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे या कामावरील पिलर चा एक भाग कोसळला त्यामुळे या कामाची पात्रता काय किती निकृष्ट दर्जाचे काम आहे हे यावरून सिद्ध होते.जर काम सुरू असते तर आणि हा असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.

पुलासाठी 20 कोटी रूपये खर्च

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.  या पुलासाठी 20 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे भूमीपूजन 2021 साली झाले. या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे समोर येत आहे.  तसेच पुलाचं काम करताना सतत अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. निकृष्ट कामामुळेच हा पूल कोसळल्याचं स्थानिक म्हणत आहेत. नगर आणि पुण्यात पहिल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर लगेच पूलाचे खांब कोसळल्याची घटना समोर आली आहे. 

भीमा नदीवरील पुलाच्या कामाची चौकशी होणे गरजेचे

भीमा नदीवरील पुलाच्या कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दौंड सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी देखील कोणतीही माहिती देत नाही, असा आरोप देखील होत आहे.  त्यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हे ही वाचा :

 मान्सूनचा एन्ट्रीलाच धडाका, बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने पुणेकरांना धडकी, 34 वर्षाचा रेकॉर्ड मोडला

                 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरूच; अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी दाखल, मुख्यमंत्र्यांकडूनही दुर्घटनेचा आढावा
मोशी दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटूनही बचावकार्य अद्याप सुरूच; अत्याधुनिक डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन घटनास्थळी दाखल, मुख्यमंत्र्यांकडूनही दुर्घटनेचा आढावा
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget