पुणे : पुण्यात (Pune) पिरंगुट घाटात (Pirangut Ghat) अपघाताची (Pune Accident) घटना घडली. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात (Tempo Accident) टेम्पोने 6 वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात (Pune News) सात जण जखमी झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पाहून अनेकांच्या मनात धडकी भरेल. अलिकडे पुण्यात (Accident) अपघाताचं प्रमाण वाढलं आहे.  


टेम्पो चालकावर गुन्हा दाखल


टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत टेम्पो चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे कोलाड महामार्गावर पिरंगुट येथील घाट उतारावर बाजूला सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पोने पाच दुचाकी आणि एका चार चाकी वाहनांना धडक दिली.


सात जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर


या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका डॉक्टरचा समावेश असून गंभीर अवस्थेत त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे. उर्वरित सहा जखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. 


भरधाव वाहनं घेतायत नाहक जीव


पुण्यात भरधाव टेम्पो आणि टँकरचा वेग अनेकांचा जीव घेत असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या अपघातात दोन जुळ्या बहिणींचा करुण अंत झाला होता. विश्रांतीवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीला टँकरची (Pune Accident) धडक बसून झालेल्या अपघातात दोन जुळ्या मुलींचा मृत्यू झाला होता. तर, त्यांचे आई-वडिल गंभीर जखमी झाले होते. सतीश कुमार झा (40) हे आपल्या 3 वर्षांच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतीवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते.


पेट्रोल टँकरची मोटारसायकलला धडक


ट्रॅफिक सिग्नलचा दिवा हिरवा होताच मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरने मोटारसायकलला धडक दिली. श्रद्धा आणि साक्षी अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावं होती. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. अपघाताच्या व्हिडीओंमध्ये ट्रॅकर चालकाची चूक असल्याचं स्पष्ट दिसत होतं. अपघातानंतर स्थानिकांनी चारही जणांना दवाखान्यात दाखल केली. मात्र, दोन्ही जुळ्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. 






महत्वाच्या इतर बातम्या :


फोटो ट्वीटप्रकरणी भाजपची हीट विकेट गेल्याचा संजय राऊतांचा दावा, भाजपची कबुली म्हणजे 'आ बैल मुझे मार' , राऊतांचा पुन्हा ट्वीट बॉम्ब