Maharashtra Pune Crime News: पुणे : पुण्यातील (Pune News) येरवडा कारागृहातून (Yerawada Central Jail) पुन्हा एकदा कैदी पळाल्याची घटना घडली. कुख्यात गुंड आशिष जाधव (Ashish Jadhav) येरवडा जेलमधून पळाला. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास तुरुंग अधिकारी कैद्यांची मोजणी करताना त्यांना आशिष जाधव दिसला नाही.