एक्स्प्लोर
पुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी
9 ऑगस्ट रोजी पद्मेश स्टॉक कांग्री या लडाखमधील स्टॉक पर्वतरांगातल्या सर्वात उंच डोंगरावर गेला होता. त्यावेळी तो जवळपास अठरा हजार फूट उंचावर होता.
पुणे : पुण्यातील 32 वर्षीय तरुण लडाखमध्ये अठरा हजार फुटांवर असताना दरीत कोसळला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीत हलवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
पुण्यातील पद्मेश पाटील हा तरुण लडाखला फिरायला गेला होता. 9 ऑगस्ट रोजी तो स्टॉक कांग्री या लडाखमधील स्टॉक पर्वतरांगातल्या सर्वात उंच डोंगरावर गेला होता. त्यावेळी तो जवळपास अठरा हजार फूट उंचावर होता. त्याला अपघात झाल्याची माहिती पद्मेशच्या मित्रांनी फेसबुकवरुन दिली आहे.
या घटनेत पद्मेश गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर लेहमधील सोनम नोर्बू स्मारक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृची गंभीर असून पद्मेशला तातडीनं दिल्लीत शिफ्ट करणं आवश्यक आहे. मात्र तिथं एअर अँब्युलन्स नसल्यानं त्याला कसं शिफ्ट करायचं हा प्रश्न उभा ठाकला आहे.
पद्मेशच्या उपचारांसाठी आठ ते नऊ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्स आणि उपचार
खर्चासाठी तातडीने मदत करण्याचं आवाहन पद्मेशच्या मित्रांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement