एक्स्प्लोर

Puit balan : गावभर होर्डिंग्स अन् 3 कोटी 20 लाखांचा दंड; पुनित बालन यांचं पुणे महानगरपालिकेला उत्तर, म्हणाले फक्त बदनामी...

पालिकेने दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा दावा पुनित बालन यांनी केला आहे. सोबतच नोटीस मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून आणि वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी केली, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक पुनित बालन (Punit balan) यांंच्यावर अनाधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्यामुळे महापालिकेने 3 कोटी 20 हजारांचा दंड ठोठावला होता. मात्र महापालिकेच्या या दंडाच्या कारवाईला सडेतोड उत्तर दिलं आहे. पालिकेने दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचा दावा पुनित बालन यांनी केला आहे. सोबतच नोटीस मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून आणि वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामीसाठी माझ्या नावे नोटीस दिली आहे, असा आरोपही त्यांनी महापालिकेवर केला आहे. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आणि उपाआयुक्त  माधव जगताप यांनी बालन यांनी नोटीस पाठविली होती. त्यात दंडासह बालन यांच्याकडून खुलासा देखील मागवला होता. त्यावर आता पुनित बालन यांनी खुलासा केला आहे. सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सप्टेंबर रोजी बैठक घेवून निर्णय घेतला आहे, असे वृत्तपत्रात आले आहे. शहरातील गणेशोत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप, स्टेज करीता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच 2019 पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी आणि रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना व विभाग मुख्य सभा ठराव क्रमांक 564 नुसार रद्द करण्यास मान्यता दिलेली असून त्याबाबत 2019 पासून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

शहरात सन 2019 गणेशोउत्सव कालावधीत मोहरम, दहीहंडी आणि गणेशोत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील 5 वर्षा करीता म्हणजेच 2022 पासून 2027सालापर्यंत गृहीत धरण्याबाबत महानगरपालिकेकडून सार्वजनिक गणेशोत्सव 2022 करीता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी आणि मनपा अधिकारी यांच्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता. या सर्व गोष्टींचा विचार करता जगताप यांनी पाठविलेली नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून मला पाठवली आहे, असे आरोप पुनित बालन यांनी केला आहे. पुनित बालन यांनी लावलेल्या अनधिकृत जाहिराती पुणेकरांमध्ये वादाचा मुद्दा बनला होता. विशेषत: त्यांनी ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे अडथळा निर्माण केला आहे. अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.

इतर महत्वाची बातमी-

Pune Punit Balan : गावभर होर्डिंग्स अन् 3 कोटी 20 लाखांचा दंड; कोण आहेत पुण्यातील गणेश मंडळांना मालामाल करणारे पुनित बालन?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget