Deepak Kesarkar On Nareandra Modi : नेहरुंनंतर विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे मोदीच; दीपक केसरकरांकडून मोदींचं भरभरुन कौतुक
पंतप्रधान जवाहरलाल नेहरूनंतर मुलांवर प्रेम करणारे पंतप्रधान लाभले आहेत. टेक्निकल विश्व मुलासाठी तयार केलं आहे, असं म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
Deepak Kesarkar On Nareandra Modi : पंतप्रधान जवाहरलाल नेहरूनंतर मुलांवर प्रेम करणारे पंतप्रधान लाभले आहेत. टेक्निकल विश्व मुलासाठी तयार केलं आहे, असं म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (deepak Kesarkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. परीक्षा मुलांसाठी महत्वाची असते, आपल्या राज्यात दोनदा परीक्षेची संधी दिली जाते. पालकांनी मुलांवर दडपण आणू नये, असाही सल्ला त्यांनी पालकांना दिला. बालभारतीच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, हे विद्यार्थी देशाचं भवितव्य घडवणारे आहेत. त्यांनी तर परीक्षेचा तणाव घेऊन टोकाचं पाऊल उचलत असतील तर ते होता कामा नये, असं विचार करणारे पंतप्रधान भारताला लाभले आहेत हे या देशाचं भाग्य आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या नंतर मुलांवर प्रेम करणारे मोदीच आहेत. त्याचबरोबर त्यांनी नवीन शिक्षण धोरणदेखील भारताला दिलं आहे. ज्यामुळे मुलांचं भवितव्य बदलणार आहे. मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे. नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे, असंही म्हणत त्यांनी मोदींच्या कार्याचं कौतुक केलं आहे.
दीपक केसरकर पुढे म्हणाले, परीक्षा पे चर्चा -2023' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल असे सांगून दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
देशात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. येत्या 10 वर्षात भारत हा जगातील तरुण देश असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकास करून भारताचे नेतृत्व करावे. अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ठ काम करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा -2023' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल असे सांगून दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे प्रत्येकांनी मोदींचा हा सल्ला ऐकला पाहिजे. अभ्यास तर महत्वाचा आहेच मात्र त्यापेक्षा आपला जीव जास्त महत्वाचा आहे असं ते म्हणाले.