एक्स्प्लोर

Pune News: मोर्चाची पोलिसांना धास्ती; आज चाकणमध्ये वाहतूक सुरळीत, मग एरवी का नाही? वाहतूक कोंडीनं त्रासलेल्या चाकणकरांचा संतप्त सवाल

Pune News: अजित पवारांनी 8 ऑगस्टला दौरा केला तेव्हा सकाळी साडे वाजता वाहतूक कोंडी होती. त्यावेळी अजित दादांनी संताप व्यक्त केला.

पुणे: चाकणच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीला (Chakan traffic jam) त्रासलेल्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा काढला आहे. हा आक्रमकपणा पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. परिणामी आज वाहतूक सुरळीत (Chakan traffic jam) आहे. अजित पवारांनी 8 ऑगस्टला दौरा केला तेव्हा सकाळी साडे वाजता वाहतूक कोंडी सुरू झाली होती. त्यावेळी अजितदादांनी देखील संताप व्यक्त केला होता. हे पाहता आजचं चित्र सकारात्मक आहे. पोलीस हेचं काटेकोर नियोजन रोज का करत नाही? असा संतप्त सवाल वाहतूक कोंडीनं त्रासलेल्या चाकणकरांनी उपस्थित केला आहे.(Chakan traffic jam) 

Chakan traffic jam: अजित पवारांच्या डोळ्यावर प्रशासनाची दिखाव्याची पट्टी हटवण्यासाठीचा पवित्रा

अभूतपूर्व वाहतूक कोंडी होणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये अजित पवारांकडून 8 ऑगस्टला पाहणी करण्यात आली. मात्र गेल्या दोन महिन्यात दिखाव्या पलीकडे प्रशासनाच्या काही हालचाली जाणवल्या नाहीत. प्रशासनाचा हा दिखावा अजित पवारांना मात्र पचनी पडला. हे पाहून वाहतूक कोंडीनं त्रासलेल्यांनी सुस्त पडलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी आणि अजित पवारांच्या डोळ्यावर प्रशासनाने टाकलेली दिखाव्याची पट्टी हटवण्यासाठी आज वाहतूक कोंडी मुक्त चाकण कृती समिती रस्त्यावर उतरली आहे. पिंपरी चिंचवडमधील पीएमआरडीएच्या कार्यालयावर आज त्रस्त चाकणकरांचा पायी मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात स्थानिक खासदार अमोल कोल्हे आणि आमदार बाबाजी काळे ही सामील होणं अपेक्षित आहे. चाकण ते आकुर्डी पीएमआरडीए असा पंचवीस किलोमीटरचा मोर्चा का काढला जातोय. असा प्रश्न अनेकांना पडला असेलचं. तर त्याचं मूळ कारण हे पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील चौकात दडलंय. या चौकात वाहतूक कोंडी नित्याची असते. याचं चौकातून चाकण एमआयडीसी मध्ये कर्मचाऱ्यांना जावं लागतं. चार फेजमध्ये विस्तारलेल्या या एमआयडीसीत 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहनं ये-जा करतात. यात चाकण-शिक्रापूर मार्गावरून अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरवरुन येणारी अवजड वाहतूक जेएनपीटीकडे जाते. त्यामुळं या चौकातील कोंडीत अवजड वाहनांची ही भर पडते. 

Chakan traffic jam:  अजित पवारांच्या समोर केवळ कारवाईचा दिखावा मांडला

केवळ इथंच नव्हे तर पिंपरी चिंचवड ते चाकण या मार्गात दहा स्पॉट आहेत, जिथं कायमचं वाहतूक कोंडी असते. अनेकदा तर एखाद्या किलोमीटरचं अंतर कापायला तासभर ताटकळावे लागते. हे सगळं अजित पवारांनी स्वतः अनुभवलं, 8 ऑगस्टला स्वतः पाहणी दौरा ही केला. पण प्रत्यक्षात गेल्या दोन महिन्यांत प्रशासनाने अजित पवारांच्या समोर केवळ कारवाईचा दिखावा मांडला. जो अजित दादांना ही पटला. प्रत्येक काम तोलून-मापून पाहणाऱ्या अजित दादांना हे पटलं कसं काय? याचं चाकणच्या कोंडीत अडकणाऱ्या प्रत्येकाला नवल वाटलं. अजित पवार त्यानंतर दहा दिवसांपूर्वी येऊन गेले, तेंव्हा त्यांनी हा दिखावा पाहून प्रशासनाची खरडपट्टी करणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी पाठराखण केल्याचं पाहिलं अन त्यानंतर वाहतूक कोंडीनं त्रासलेले हे सगळे रस्त्यावर उतरलेत. सुस्तावलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आणि अजित पवारांच्या डोळ्यावर प्रशासनाने टाकलेली पट्टी हटवण्याचा हा प्रयत्न आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Embed widget