एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी- चिंचवड गोळीबाराने हादरले; व्यावसायिकाने दुसऱ्या व्यवसायिकावर गोळ्या झाडल्या

Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होता. त्यामुळे हर्षलने अजयला मारण्यासाठी कट रचला.

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. शहरामधील चिखली परिसरात व्यवसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने थेट दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्या. या घटनेत व्यावसायिक अजय सुनील फुले (वय19, रा. मोहननगर, चिंचवड) हा जखमी झाला. पोलिसांनी गोळीबार प्रकरणात हर्षल सोनवणेला (रा. जाधववाडी, चिखली) अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलसह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. 

पाठलाग करत मुख्य आरोपीला पकडले

अजय सुनील फुले हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी अजय आणि हर्षल यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायिक स्पर्धेतून वाद सुरू होते. या वादातून हर्षल सोनवणेनं दोन मित्रांच्या मदतीने कट रचून अजय फुलेवर गोळीबार केला. सुदैवाने अजय फुले हा बचावला. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत.

गोळीबार केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल सोनवणे फरार झाला होता. चिखली पोलीस हर्षलचा शोध घेत असताना तो चाकणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करुन नाणेकरवाडी परिसरातून हर्षलच्या मुसक्या आवळल्या. 

व्यावसायिक वादातून गोळीबाराचा कट 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या अजयचा गॅस शेगडीचा व्यवसाय आहे. गोळीबार केलेला आरोपी हर्षलचा सुद्धा तोच व्यवसाय आहे. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरु होता. त्यामुळे हर्षलने अजयला मारण्यासाठी कट रचला. शाम आणि लिलारे अजयच्या दुकानात येऊन वाद मिटवण्यासाठी गेले होते. चर्चा सुरु असतानाच हर्षल सुद्धा त्याठिकाणी आला. यावेळी हर्षलने पिस्टल काढत तीन गोळ्या अजयवर झाडल्या. एक गोळी अजयच्या दंडाला लागली. दुसरी गोळी किर्तीकुमार लिलारेच्या मानेला लागली. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Onion Export Crisis: कांद्यामुळे शेतकरी हवालदिल, निर्यातबंदीवर तोडगा कधी?
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News |  ABP Majha
JCB Wedding : कोल्हापुरात JCB मधून नवदाम्पत्याची वरात, हटके मिरवणुकीची जोरदार चर्चा
Manoj Jarange Sumons: आझाद मैदानातील आंदोलन प्रकरणी मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स
Kapaleshwar Mandir Sanjay Raut : कपालेश्वर मंदिरात नाशिकमध्ये संजय राऊतांसाठी पूजा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
Embed widget