एक्स्प्लोर

आळंदीत अध्यात्माचे पाठ देणाऱ्या महाराजाच्या मारहाणीनंतर विद्यार्थी कोमात

पुण्यातील देवाची आळंदीमध्ये आध्यात्मिक शिक्षण संस्थेतल्या एका महाराजाने विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. भगवान पोव्हणे असं मारहाण करणाऱ्याचं नाव आहे. हरीपाठ आणि अभ्यास करत नाही या कारणाने अवघ्या 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी तब्बल सात दिवस कोमात होता.

पिंपरी चिंचवड : अध्यात्माचे पाठ देणाऱ्या महाराजानेच विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीनंतर हा विद्यार्थी तब्बल सात दिवस कोमात होता. पुण्यातील देवाच्या आळंदीत ही धक्कादायक घटना घडली आहे. भगवान पोव्हणे असं त्या महाभाग महाराजाचे नाव आहे. माऊली ज्ञानराज प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्थेतील हा महाराज आहे. भगवान पोव्हणे याने 10 फेब्रुवारीला अकरा वर्षीय ओम चौधरीला हरिपाठ आणि अभ्यास करत नसल्याचा जाब विचारला आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली. त्याने ओम चौधरीच्या हात, पाय, पाठ आणि छातीवर काठीने प्रहार केला. छातीवरील काठी ही थेट हृदयावर लागली होती. तेव्हा ओमने ती कळ सहन केली, तशाच अवस्थेत भगवान महाराज त्याला औरंगाबादला घेऊन गेला. पण तिथे ओम बेशुद्ध पडला, याची माहिती मुलाच्या आईला देताना तो आजारी असल्याचं महाराजाने थाप मारली. तिथून त्याला पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील खाजगी रुग्णालयात आणलं गेलं. ओमची आई त्याच रुग्णालयात साफसफाईचं काम करते, त्यामुळे कमी खर्चात इथेच उपचार होईल अशी त्यांची धारणा होती. 12 फेब्रुवारीच्या रात्री ओमवर तातडीने उपचार सुरु झाले, मात्र तो कोमात गेला होता. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अन् तब्बल सात दिवसांनी म्हणजेच 19 फेब्रुवारीला तो शुद्धीत आला. जीवदान मिळालेल्या ओमने घडला प्रकार आईला सांगितला आणि ही धक्कादायक बाब समोर आली. ओमच्या छातीत पाणी झाल्याचं, तसेच रक्तस्त्राव होण्याची चिन्हही आहेत. याप्रकरणी महाराजावर आळंदी पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी महाराजाच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहे. ओमची मात्र प्रकृती अद्याप ही चिंताजनक आहे. पुढील उपचारासाठी त्याला पिंपरीतील डॉ डी वाय पाटील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ओमच्या वडिलांचे निधन झालंय, आई मजुरी करते, म्हणूनच ओमला देवाच्या आळंदी येथे अध्यात्मिक संस्थेत प्रवेश घेतला होता. पण आध्यत्मिक शिक्षण देणारा महाराजच त्याच्या जीवावर उठला. आता ओमच्या प्रकृतीसाठी मदतीची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
NCP Vaishali Nagwade: राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?
राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, कोण आहेत वैशाली नागवडे?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget