Pimpri Chinchwad Fire पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड आणि गोळीबार हे समीकरणच झालं असल्याचा प्रत्यय येतोय. पिंपळेगुरवमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांकडून थेट पिंपरी चिंचवड पोलिसांवर ही गोळीबार केला आहे. प्रतिउत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. पण एक पोलीस कर्मचारी खाली पडल्याने त्यांना किरकोळ इजा पोहोचली आहे. या गोळीबारानंतर अखेर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. 

Continues below advertisement


विशेष म्हणजे घटनास्थळी दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश देखील उपस्थित होते. अशी माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी दिली. ही चकमक काल रात्री चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत साडे अकराच्या सुमारास घडली आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वात अँटी गुंडा स्कॉड आणि सांगवी पोलीस गोळीबारातील आरोपींच्या मुसक्या आळवण्यासाठी सापळा रचला होता. 


मात्र त्या जाळ्यातून सुटण्यासाठी तिन्ही आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, मग प्रत्युत्तरात पोलिसांना देखील गोळीबार करावा लागला. या चकमकीत पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आळवल्या. या गुन्हेगारांनी 18 डिसेंबरला पिंपळेगुरव मध्ये दिवसाढवळ्या गोळीबार केला होता, यात योगेश जगतापची हत्या झाली होती.


इतर महत्वाचा बातम्या