पुणे : राज्यातील पेपर फुटीप्रकरणाची चौकशी सीबीआयकेडे देण्यात यावी, या भाजपच्या मागणीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. रजपूत, दाभोलकर केस सीबीआयकडेच आहेत, त्यांच काय झालं? असा प्रश्न उस्थित करत राज्य सरकार खोलात जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
"महापोर्टल भाजपच्या काळात झालंय, तो घोटाळा उघडकीस आहेच. हे सगळे धागेदोरे भाजपच्या मोठ्या नेत्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीतीपोटी हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करत आहेत. जेणेकरुन केंद्राचा कंट्रोल यावर राहील. अशी टीका रोहित पवार यांनी केली.
पडळकरांवर लोकांचा रोष का?
आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आहे. परंतु, पडळकरांवर लोकांचा एवढा रोष का आहे? हे लक्षात घ्यायला पाहिजे असा खोचक टोला पडळकरांना रोहित पवारांनी लगावला.
पडळकरांवर झालेला हा हल्ला व्यक्तिगत चुकिचा वाटतो. परंतु, घटना घडून एवढे दिवस झाल्यानंतर आज या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. राजकीय भांडवल करण्यासाठी एवढ्या दिवसांनी हे व्हिडिओ व्हायरल होत असतील तर ते चुकीचे आहे. कुठल्याही आमदाराला सुरक्षा मिळते. त्यांनी घेतली नाही हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. एकत्रित बसून ही परिस्थिती का आली याचा विचार व्हायला हवा, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.
भाजपचे मोठे नेते कधी टीका करत नाहीत
भाजपचे मोठे नेते एवढ्या खालच्या पातळीवर जावून टीका करत नाहीत. परंतु, छोट्या नेत्यांना संधी अशासाठीच दिली जाते. त्यामुळे हे छोटे नेते खालच्या पातळीवर टीका करतात. भाजप त्यांना फक्त वक्तव्य करण्यासाठीच नेमत आहे. त्यामध्ये पडळकर येतात की नाही हे त्यांच्या वक्तव्यावरुन कळतेच. असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या