पिंपरी चिंचवड : राहत्या घराच्या इमारतीतून उडी मारुन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पिंपरीत उघडकीस आली आहे. महेंद्रसिंग बोरा असं तरुणाचं नाव असून तो त्याच इमारतीत असलेल्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.
महेंद्रसिंगने इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्याच इमारतीत मदर्स किचन नावाचे हॉटेल मध्ये तो काम करत होता. महेंद्रसिंगच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिंजवडीतील फेज 1 मध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
अवघ्या चार दिवसांपूर्वीच तो मदर्स किचनच्या हिंजवडीतील शाखेत रुजू झाला होता. त्यापूर्वी त्याने बालेवाडीतील त्याच हॉटेलच्या ब्रँचमध्ये काम केलं होतं.
दोन दिवसांपासून महेंद्र आजारी होता आणि त्याला चक्करही येत होती, अशी माहिती त्याच्या रुम पार्टनर्सनी दिली. त्यामुळे तो इमारतीवरुन पडला की त्याने आत्महत्या केली हा संशया निर्माण झाला आहे. हिंजवडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.