एक्स्प्लोर

PCMC News : बुलेट राजांवर पोलिसांची करडी नजर! एका दिवसात 195 जणांवर कारवाई; 99 हजारांचा दंड वसूल

PCMC News : हौशी बुलेट राजांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र आहे. या बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई करण्यात येत आहे.

PCMC News : हौशी आणि अतिउत्साही बुलेट राजांवर (bullet) पिंपरी चिंचवड पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र आहे. या बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये (PCMC) वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई करण्यात येत आहे. शुक्रवारी एका दिवसांत पोलिसांनी कर्कश आवाज 195 बुलेटराजांवर कारवाई केली आहे आणि त्यांच्याकडून 99 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटराजांना पोलिसांनी चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून येत आहे. 

पिंपरी चिंचवडमध्ये यापूर्वी अशा बुलेट राजांवर आता थेट गुन्हे दाखल केले गेले. मागील सहा महिन्यात वीस हजार बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वीस लाखांचा दंडही त्यांच्याकडून वसूल करण्यात आला. मात्र तरीही बुलेट राजांमध्ये सुधारणा होईना, म्हणून थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली होती. वाहन जप्ती आणि परवाना रद्द करण्याच्या दृष्टीनेही पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस पावलं उचलत आहेत. त्यात आता पुन्हा पोलिसांची त्यांच्यावरच नजर असल्याचं समोर आलं आहे.

यापूर्वी तब्बल 22 लाखांचा दंड वसूल
पिंपरी-चिंचवड शहरातून सायलेन्सर बदलून बुलेट चालवल्या जातात आणि लोकांना फार याचा त्रास होत आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. हा प्रकार आमच्या देखील निदर्शनास आला. मागील सहा महिने आपण बुलेटवर कारवाई केल्या. त्यात 22 लाखांचा दंड वसूल केला तरी काही चालकांमध्ये फरक पडलेला नाही. मॉडिफाय करण्यासोबतच, पर्यावरणाचा ऱ्हास करणे, यावरुन कारवाई केली जात आहे. आतापर्यंत दंडात्मक कारवाई केली होती. मात्र तरुणांची वागणूक पाहता आता आम्ही गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच हा प्रकार थांबला नाही तर वाहन देखील जप्त करण्याच्या विचारात आम्ही आहोत. त्यामुळे तरुणांनी नियमांचं पालन करावं नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिला आहे. 

बुलेट मॉडिफाय करणं भोवणार?
बुलेटला वेगळा सायलेन्सर बसवतात. त्यामुळे शहरातील अनेक भागात ध्वनी प्रदूषण होतं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच वायु प्रदूषणाचा प्रश्नदेखील कायम आ वासून उभा असतो. त्यामुळे दोन्ही शहरात अनेकदा या प्रकारची कारवाई करण्यात आली होती. अनेक वेळा वेगवेगळे प्रश्न आणि समस्या निर्माण करताना हे तरुण कायम दिसतात. यावरुन यंदा पोलिसांनी अतिहौशी तरुणांना चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Embed widget