एक्स्प्लोर

मीच घेतली गौरी लंकेश यांच्या हत्येची सुपारी- परशुराम वाघमारे

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी परशुराम वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान एसआयटीने केलेल्या चौकशीत परशुराम वाघमारेने धक्कादायक माहिती सांगितली आहे.

सोलापूर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी परशुराम वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान एसआयटीने केलेल्या चौकशीत परशुराम वाघमारेने धक्कादायक माहिती सांगितली आहे. गौरी लंकेश यांच्या खुनाची सुपारी आपणच घेतल्याची कबुली वाघमारेने दिली.

तसेच सुपारी देणाऱ्यांनी पैसे न दिल्याचा देखील त्याने खुलासा केला. सुपारी देणाऱ्यांनी केवळ 10 हजार रुपये अॅडव्हान्स आणि बंगळुरुत राहण्यासाठी तीन हजार रुपये दिले. उर्वरीत रक्कम न देताच ते पिस्तुल घेऊन फरार झाले, असं वाघमारेने एसआयटीच्या चौकशीत सांगितले.

कोण आहे हा परशुराम वाघमारे?

परशुराम अशोक वाघमारे (वर्षे 26) विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्याचा रहिवासी आहे. बसव नगरात त्याचं घर आहे. आईवडील दोघेही मजुरी करून घर चालवतात. आई भांडे विकते तर वडील मिळेल तिथं काम करतात.

एकुलता एक मुलगा असल्याने घरी परशुरामचे लाड व्हायचे. नावाला त्याने बीएससी डिप्लोमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. पण हिंदुत्ववादी विचाराने तो कमालीचा प्रेरीत झाला होता. हिंदुत्वासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्यातच महाराष्ट्रातल्या अमोल काळे याच्याशी त्याचा संपर्क झाला. धर्म रक्षण्यासाठी प्रसंगी जीवही घ्यायची तयारी त्याने केली. बेळगावात डोंगरावर, रानावनात जाऊन मित्रांच्या साथीने एअरगन चालवण्याच प्रशिक्षण घेतलं आणि गौरी लंकेश यांचा काटा काढला. पण एका महिलेला मारले याचा त्याला नंतर पश्चाताप झाला.

परशुरामची पार्श्वभूमी सुद्धा तेवढीच वादग्रस्त आहे. त्याला काही करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय होती. त्यासाठी तो सामाजिक शांतता बिघडवण्याच्या कामात व्यस्त असायचा. मशिदीवर ओम लिहिणे, मंदिरावर चाँद काढणे, स्वतःच पाकिस्तानचा झेंडा रोवून तो नंतर जाळणे अशी कृत्ये तो करायचा.

2012 साली याच सिंदगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात समाजविघातक कृत्ये केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. प्रमोद मुतालिक यांनी श्रीराम सेना काढली, तेव्हा सिंदगी तालुक्यातील श्रीराम सेनेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी तो पार पाडायचा.

परशुराम याचं कुटुंब अत्यंत साधं, गरीब आणि कष्टकरी आहे. वडील अशोक आणि आई जानकी हा त्याचा परिवार. गेल्या काही वर्षांपासून त्याचे आईवडील रायचूर जिल्ह्यातील मानवी गावात कामासाठी वास्तव्याला आहेत. परशुराम कॉलेज शिकत असल्याने तो सिंदगी गावातच राहिला. अर्थार्जन करण्यासाठी म्हणून त्याने नेट कॅफे सुरू केला. या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तो लोकांना मिळवून द्यायचा. पण असं काही विपरीत काम करेल याची कल्पना परशुरामच्या आईवडिलांना नव्हती. गौरी लंकेश हत्या प्रकरणात परशुरामला झालेली अटक त्यांच्यासाठी धक्का होता.

परशुराम यांच्या दोन अन्य साथीदारांना सुद्धा एसआयटीने ताब्यात घेतलंय. परशुरामने चालवलेल्या बंदुकीतून गौरी लंकेश यांची हत्या झाली हे आता उघड झालंय. पण त्याच्या हाती बंदूक देऊन, त्याचा माथा भडकवणारे सूत्रधार शोधणं त्याहून जास्त महत्वाचं आहे. कदाचित त्याची पाळंमुळं दाभोळकर, पानसरे हत्याकांडात रोवली गेली असावीत.

महत्त्वाच्या बातम्या

Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंच्या FDA ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाने ठोठावलेली 5 लाखांची 'ती' नुकसानभरपाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाने ठोठावलेली 5 लाखांची 'ती' नुकसानभरपाई रद्द, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
Embed widget