एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई-पुणे महामार्गावर 2 कोटी 90 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाठलाग करून 2 कोटी 90 लाख रुपयांच्या जुना नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. उर्से टोल नाक्यावर ही कारवाई सायंकाळी साडे सातच्या सुमारास झाली.
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाठलाग करून 2 कोटी 90 लाख रुपयांच्या जुना नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. उर्से टोल नाक्यावर ही कारवाई सायंकाळी साडे सातच्या सुमारास झाली.
रोकड पुण्यातील दोन बिल्डर आणि एका व्यापाऱ्याची ही रोकड होती. गौरव अगरवाल, दिलीप गुप्ता या दोन बिल्डरची आणि व्यापारी नवेंदू गोयल यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे.
पुण्यातून मुंबईला मर्सिडीज बेंझ गाडीतून हे तिघे हि रोकड बदलण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र दिवसभर कोणीच दलाल न भेटल्यान, ते पुण्याला परतत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना लागली. तेव्हा लोणावळा पोलिसांनी या गाडीचा पाठलाग सुरु केला आणि उर्से टोल नाक्याजवळ देहू रोड विभाग पोलिसांनी सापळा रचून गाडीसह रोकड आणि तिघांना ताब्यात घेतले. यात एसपी स्कॉडने ही महत्वाची भूमिका बजावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement