एक्स्प्लोर

ॲम्ब्युलन्सवरील सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन संदर्भात मोठी घोषणा केली. ॲम्ब्युलन्सवर  आताचा कर्कश हॉर्न नको, असं त्यांनी म्हटलं आहे. 

पुणे : गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचं सांगितल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी आता अॅम्ब्युलन्सच्या सायरन (siren on ambulance) संदर्भात मोठी घोषणा केली. पुण्यात आयोजित कार्यक्रमात म्हटलं की, मी आता आदेश काढणार आहे की ॲम्ब्युलन्सवर जर्मन संगीतकाराने तयार केलेले संगीत किंवा धुन वापरण्यात यावी.ॲम्ब्युलन्सवर  आताचा कर्कश हॉर्न नको, असं त्यांनी म्हटलं आहे. 

तुमच्या वाहनांमध्ये आता भारतीय वाद्यांचे आवाज, नवे हॉर्न लवकरच बनणार

गाड्यांना सध्या जे हॉर्न आहेत त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचं काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी सांगितलं होतं.  तुमच्या गाड्यांमध्ये आता कर्कश आवाजांच्या हॉर्नपेक्षा मधूर आणि सुरेल आशा भारतीय वाद्यांमध्ये आता तुमच्या गाड्यांचे हॉर्न वाजणार आहेत आणि यासंबंधित लवकरच कायदा करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं होतं.

Vehicle Horns : तुमच्या वाहनांमध्ये आता भारतीय वाद्यांचे आवाज, नवे हॉर्न लवकरच बनणार

पुण्यात काय म्हणाले गडकरी

केंद्रीय मंत्री गडकरी पुण्यात म्हणाले की,  पुण्यात मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुण्यातील एअरपोर्टसाठी संरक्षण विभागाकडून जागा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून चंदीगडच्या आणि पुण्याच्या जागेची अदलाबदल करण्यात येईल. त्याला मंजुरी मिळालीय. पुण्यातील नदी प्रकल्पालाही मंजुरी मिळालीय.  पुण्यातही नागपुरप्रमाणे वाघोली ते शिरुर हा रस्ता पन्नास हजार कोटी खर्च करून बांधण्याचा विचार. हा रस्ता तीनमजली असेल. हे काम तीन मजल्याचे असेल. दोन मजले उड्डाणपूलाचे तर शेवटचा तिसरा मजला मेट्रोसाठी असेल. यासाठी मदत करण्यास केंद्र तयार आहे, राज्याने त्यासाठी जी एस टी माफ करावी, असं त्यांनी म्हटलं आहे.  

ते म्हणाले की, मुंबईत नरिमन पॉईंटला दिल्लीला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राज्य सरकार सोबत लवकरच बैठक घेणार आहे.  पुणे ते कोल्हापूर,  पुणे ते सोलापूर,  पुणे ते बारामती अशा ज्या ज्या ठिकाणी ब्रॉडगेज रेल्वे आहे तिथे मेट्रो चालवता येईल.  याचे तिकिट रेल्वेच्या तिकीटाएवढे राहील.  या मेट्रोला दोन मिलगाडीचे डबे असतील.  ज्यामधून दुध,  फळे यांची वाहतूक होईल. ही मेट्रो खाजगी व्यवसायिकांना चालविण्यास द्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे. 

गडकरी म्हणाले की, अजित पवारांनी ठरवलं तर पुण्याला सर्व प्रकारच्या प्रदूषणातुन मुक्त करु शकतात.   पुणे- बंगलोर एक्स्प्रेस वे चाळीस हजार कोटी खर्च करून बांधणार आहोत.  या एक्स्प्रेस वे च्या शेजारी नवीन पुणे वसवावे, असंही ते म्हणाले. 

पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय
गडकरी म्हणाले की,  माझ्या आयुष्यात पेट्रोल आणि डिझेल बंद करायचंय.  मी राजीव बजाज यांना सांगितल की जोपर्यंत तुम्ही इथेनॉलवर चालणारी गाडी तयार करत नाही तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका.  त्यांनी तशी गाडी तयार केली.  मी तीन ते चार महिन्यांत ऑर्डर काढतोय की सर्व प्रकारच्या कारसाठी अगदी मर्सिडीज सुद्धा  पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल अशी इंजिन बसवावी लागतील. दुचाकीही इथेनॉलवर चालवता येतील, असं गडकरी म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget