एक्स्प्लोर

Shivajirao Adhalarao Patil: शिवाजी आढळरावांनी अजित पवारांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ! एकनाथ शिंदेंशी जवळीक वाढली?

shivajirao adhalarao patil absent in ajit pawars Programme: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवाजी आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक घाडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. अशातच काही नेते नाराज असल्याच्या, किंवा आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा पक्षांतर करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते शिवाजी आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आज पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरुये पण आढळराव मात्र कुठं ही दिसून आलेले नाहीत. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 

मात्र, हेच शिवाजी आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. मुख्यमंत्री भीमाशंकर दर्शनाला आले तेव्हा आणि आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला सर्वात आधी आढळराव उपस्थित होते. लोकसभेपुर्वी राष्ट्रवादीत आलेले आढळराव पाटील अलीकडे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंशी अधिकची जवळीक साधत आहेत का अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळंच अजित पवार शिरूर लोकसभेत आले की, आढळरावांच्या अनुपस्थितीची चर्चा नेहमीच रंगते. या राजकीय घडामोडींकडे पाहता आढळराव पुन्हा शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता ही वर्तवली जात आहे. 

जनसन्मान यात्रेसह लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाकडे फिरवली पाठ

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) गैरहजेर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाकडे देखील आढळराव पाटलांनी पाठ फिरवल्याची चर्चा होती. शिरुर लोकसभा मतदार संघात पराभवानंतर काही आमदार विचारात घेत नसल्याची खंत यापूर्वी आढळराव पाटलांनी व्यक्त केली होती.आजपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा शिरुर लोकसभा मतदारसंघात असून पहिल्याच दिवशी आढळराव पाटलांची (Shivajirao Adhalarao Patil) गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती.

शिवाजीराव आढळराव पाटलांचा लोकसभेसाठी अजित पवार गटात प्रवेश

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी (२६ मार्च) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवली. 

आढळराव पाटलांनी शिवसेना का सोडली?

लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या नेत्यांची जागावाटपाची चर्चेवेळी अजित पवारांनी शिरूरच्या जागेवर दावा सांगितला. शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील हे या जागेसाठी आग्रही होते. ते या मतदारसंघाचे माजी खासदार होते. त्यांची या मतदारसंघात ताकद आहे. त्यामुळे सेनेला ही जागा मिळावी, अशी मागणी होती. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटली त्यानंतर आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget