पुणे : देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त महाराष्ट्राच्या मातीतले लाडके वाद्य ढोल-ताशाच्या पारंपरिक ठेक्यातील राष्ट्रगीत आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ओंकार भस्मे यांची ही संकल्पना आणि निर्मिती असून अशा प्रकारचा हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. हा व्हिडीओ आज सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. 


पिच्चरवाला प्रोडक्शनच्या वतीनं हा व्हिडीओ तयार करण्यात आला असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्ताने आज हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. देशाचं राष्ट्रगीत आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यात आलं आहे. पण महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्याच्या म्हणजे ढोल ताशाच्या गजरात राष्ट्रगीत पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


राष्ट्रगीत ढोल ताशा इंस्ट्रुमेंटल
संकल्पना आणि निर्मिती: ओंकार दिगंबर भस्मे
संगीत संयोजन: ओंकार सूर्यवंशी
रिदम सुपरव्हिजन: गणेश बोज्जी 
प्रोग्रॅमिंग: नवनीत जैन 
वादक: ओंकार सूर्यवंशी, गणेश बोज्जी, ओंकार घाडगे, संकेत सातपुते, शुभम नितनवरे, अजिंक्य गायकवाड 
व्हिज्युअल: ओंकार मरकळे


 






स्वातंत्र्यदिनी पुण्यात 75 विविध कार्यक्रमातून स्वच्छता मोहीम
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा येत आहे. आज 15 ऑगस्ट 2022, यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील स्वच्छतेचं महत्व लक्षात घेऊन यंदा पुणेकरांनी (Pune) 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून दिवसभरात 75 जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले आहे. यात दोन स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. 'स्वच्छ' आणि 'सारे जहॉं से अच्छा' या दोन संस्थेमार्फत स्वच्छ आणि सुंदर पुण्याचं स्वप्न साकारणार आहेत. या अंतर्गत कचरा गोळा करणे, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण आणि वृक्षारोपण मोहीम हाती घेतले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: