एक्स्प्लोर

मोदींचे मित्र गौतम अदानी शरद पवारांचेही जिगरी यार; अदानी सहकुटुंब बारामतीत, पवारांनी केलं स्वागत तर रोहित पवारांचे सारथ्य

जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असलेले गौतम अदानी एरवी ओळखले जातात ते पंतप्रधान नरेंद्र मोंदीसोबत असलेल्या गाढ्या मैत्रीसाठी. याचमुळे अदानी देशातील विरोधी पक्षांच्या टीकेचे ही लक्ष्य असतात.

पुणे : देशातील बहुचर्चित उद्योगपती गौतम अदानी आज बारामतीत होते. शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांना अदानींनी हजेरी लावली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवत अदानींच सारथ्य केलं. जे अदानी एरवी देशातील विरोधी पक्षांच्या टीकेच्या केंद्रस्थानी असतात त्याच अदानींनी आज विरोधी पक्ष ज्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहतात त्या पवारांच्या घरी पाहुणचार घेतला. 

जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असलेले गौतम अदानी एरवी ओळखले जातात ते पंतप्रधान नरेंद्र मोंदीसोबत असलेल्या गाढ्या मैत्रीसाठी. याचमुळे अदानी देशातील विरोधी पक्षांच्या टीकेचे ही लक्ष्य असतात. मात्र याच अदानींची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याच्यासोबत देखील तेवढीच गहिरी दोस्ती आहे. आज बारामतीत पवार कुटुंबीयांकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना अदानी सहकुटुंब हजर होते. अदानी जेव्हा बारामती एअरपोर्टवर पोहचले तेव्हा आमदार रोहित पवार त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. तिथून पुढे रोहित पवारांनी स्वतः गाडी चालवत अदानींच सारथ्य केलं आणि अदानी जेव्हा गाडीतून उतरले तेव्हा त्यांनी शरद पवारांचा हात हातात घेऊन नमस्कार केला.  पण अदानींची हा काही पहिलाच बारामती दौरा नव्हता, सुप्रिया सुळेंनी याचा खुलासा केला.

 गौतम अदानी आणि पवार कुटुंबांचे संबंध गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून आहेत.  अदानी दर वर्षी दिवाळीला बारामतीत येतात. आज तिथीनुसार दिवाळी नसली तरी सायन्स सेंटरचे उद्घाटन हा दिवाळीचा योग आहे आणि अशावेळेस गौतम अदानी उपस्थित आहेत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.  खरं तर कोणी कोणाशी मैत्री करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अदानींबाबत असं म्हणता येत नाही. कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर अदानींच साम्राज्य देश - विदेशात ज्या वेगाने वाढलय त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांची भाषणं मोदींबरोबरच अदानींच नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने मुंबई एअरपोर्टला अदानींचे नाव देण्यावरून आंदोलन केलं होतं तर राहुल गांधींसह कॉंग्रेसचे नेते अदानींवर मोदी सरकार मेहरबान असल्याचा नेहमीच आरोप करत असतात.  पण त्याच शिवसेना आणि कॉंग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षांचे गौतम अदानी हे तेवढेच मित्र आहेत. हा मैत्रीचा त्रिकोण आहे. यातील मोदी आणि अदानी हे दोन कोन अनेकांना माहित असतात पण तिसरा पवार नावाचा कोण बऱ्याचदा अदृश्य स्वरुपात असतो. पडद्यामागच्या  हालचालींसाठी या त्रिकोणी मैत्रीचा उपयोग होतो. 2014 साली या मैत्रीतुनच गुजरातमधील अदानींच्या फार्महाऊसवर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली होती आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली होती. 

 कार्यक्रम आटोपल्यावर गौतम आणि त्यांची पत्नी प्रिया अदानी यांनी शरद पवारांच निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत जाऊन पवारांचा पाहुणचार घेतला.  यावेळी सर्व पवार कुटुंब हजर होतं. खरं तर राजकारणी आणि उद्योगपती यांचे संबंध असल्याचे अनेकदा दिसून येतं. शरद पवारांचे तर अनेक उद्योगपतींशी नेहमीच मैत्रीचे संबंध राहिलेत.  पण गौतम अदानींची गोष्ट निराळीय.  कारण अदानी आणि त्यांच्या सुपरसोनिक वेगाने झालेल्या प्रगतीचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला जातो.  पण त्याच अदानींशी मोदी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवारांची  गहिरी मैत्री अनेकांना बुचकळ्यात टाकणारी वाटू शकते. 

 विरोधी पक्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवरची टिका अदानींच नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही .त्याच विरोधी पक्षांसोबत आदल्या दिवशी राष्ट्रपती निवडणुकीत मोदी विरोधाची आखणी करणारे शरद पवार रातोरात प्रवास करून बारामतीत पोहचतात आणि सहकुटुंब अदानींचे स्वागत करतात. पवारांचा  हा सर्वस्पर्शीपणा त्यांच्या राजकारणाच वेगळेपण राहिलय. हे वेगळेपण पवारांच्या राजकारणाला अनेकदा गहिरं बनवतं आणि कित्येकदा टिकेचे धनीही बनवतं. 

संबंधित बातम्या :

Sharad Pawar :  कोणत्याही क्षेत्रात पुढं जायचं असेल तर विज्ञानाची साथ गरजेची, माणूस चंद्रावर जातोय, हा बदल विज्ञानामुळेच : शरद पवार

Sharad Pawar Gautam Adani: बारामतीत 'पॉवरफूल' कार्यक्रम; शरद पवार, गौतम अदानी यांच्या उपस्थितीत सायन्स पार्कचे आज उद्घाटन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar :हत्या, आरोपी, पोलीस आणि चौकशीचा थरार;आरोपांनी गाजलेली वडेट्टीवारांची पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 06 January 2025Chhagan Bhujbal PC : कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रीपद नको, छगन भुजबळ स्पष्टच बोलले..HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
छत्तीसगड पत्रकार हत्या : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
धक्कादायक! वाघाचे दोन तुकडे करुन जंगलात फेकले; वन विभागाचे अधिकारी तत्काळ धावले
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
पुण्यातील माजी भाजप आमदाराचा डोळे दीपावणारा शुभ्र पांढऱ्या रंगातील आलिशान राजमहल! नजर हटता हटेना
Neelam Gorhe: ... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
... तर हे प्रकरणच घडलं नसतं; बीड प्रकरणावरील पत्रावरुन निलम गोऱ्हेंचा शरद पवारांना टोला
Sanjay Shirsat : शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
शिर्डीत गाड्यांनी भिकारी आणले जातात, नशेखोरांमुळे गुन्हेगारी वाढतेय; संजय शिरसाटांचे सुजय विखेंना समर्थन
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
धनंजय मुंडेंविरोधातल्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ, मनोज जरांगे, दमानियांवर कारवाईसाठी वंजारींसह मुंडे समर्थक आक्रमक
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
प्राचीन हिंदू धर्मशास्त्र सर्वसामान्यांस समजावल्यास आपली संस्कृती समृद्ध होईल - चंद्रकांत पाटील
Embed widget