एक्स्प्लोर

संतापजनक! पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर जीवघेणं दृष्य, क्रेनमध्ये बसून कामगाराने बनवलं रील 

 पुणे-मुंबई मिसिंग लिंक वर  एक धक्कादायक पद्धतीने करण्यात आली आहे. ही दृश्य पाहिल्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC प्रवाश्यांच्या जीवाशी खेळतेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Mumbai Pune Missing Link News :  पुणे-मुंबई मिसिंग लिंक वर  एक धक्कादायक पद्धतीने करण्यात आली आहे. ही दृश्य पाहिल्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC प्रवाश्यांच्या जीवाशी खेळतेय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मिसिंग लिंकवरील 180 फूट उंचीच्या पुलाचं किरकोळ काम सुरु आहे, त्यावेळी पुलाच्या वरच्या टोकावर क्रेनमध्ये बसून एका कामगाराने हे संतापजनक रील बनवलं आहे.

क्रेनची ट्रॉलीमध्ये चार ते पाच जण काम करत असल्याचं, ट्रॉली मिसिंग लिंकच्या पुलावर असल्याचं आणि मिसिंग लिंकवरुन शेकडो वाहनं धावत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. तरी हा कामगार खुशाल रील बनवतोय. रील बनवत असताना कामगारांचे दुर्लक्ष झाले अन ट्रॉली थेट पुलावर कोसळली तर किती मोठी दुर्घटना घडेल, याचा विचार केला तरी अंगावर थरकाप उडतोय. कारण पुलाखाली थेट दरी आहे, हा सगळा विचार करता MSRDC नेमकं काय करत आहे? ज्या कंपनीला मिसिंग लिंकच्या कामाचं कंत्राट दिलंय, त्यांचं ही याकडे लक्ष नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. खरं तर मिसिंग लिंकच्या या पुलावर वाहन चालक फोटो अथवा सेल्फी काढायला थांबले तरी कारवाईचा बडगा उगारला जातोय. कारण पुलावर वाहनं थांबवणं म्हणजे जीवाशी खेळल्यासारखं आहे. त्यामुळं महामार्ग पोलिसांच्या कारवाईचं स्वागतच केलं गेलं पण त्याचवेळी हा जीवघेणा रील पाहिल्यानंतर नेमकी काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं आहे.

मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड भरावा लागणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर काही प्रवासी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी वाहनं थांबवत असल्याचं समोर आलं आहे. मात्र हा प्रकार आता प्रवाशांना महागात पडणार असून महामार्ग पोलिसांनी यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड लागू शकतो, तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या कारवाईला सामोरं जायचं नसेल तर मिसिंग लिंकवरुन न थांबता सुखकर प्रवास करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे.

मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच थांबून फोटो काढणं हे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget