Mumbai Pune Expressway Wil Be Closed: जर तुम्ही मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरुन  (Mumbai - Pune Expressway)  तुम्ही प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दुपारी एक तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज (28 मे) दुपारी 12 ते 1 दरम्यान  द्रुतगती मार्गावर   सर्व प्रकारच्या  वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आले आहे. 


यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे  द्रुतगती मार्गावर आज एक तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या लेनवर वाहतूक बंद राहील.  हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत गॅन्ट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर1.55  किमी अंतरावर ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.


कशी वळवली जाणार वाहतूक?  


या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर हलक्या वाहनांना कळंबोली येथून डाव्या बाजूला वळून कळंबोली सर्कलवरून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48  या मार्गावरून मार्गस्थ होता येईल. तर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कळंबोली येथून डाव्या बाजूला वळून कळंबोली सर्कलवरून कळंबोली-डी-पॉइंट- करंजाडे - पळस्पे येथून पुढे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून पुढे मार्गस्थ होता येईल. त्याचबरोबर मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कोन ब्रिजवरून वळवून द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील. 


याआधी देखील घेण्यात आला होता ब्लॉक


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात आला होता.  एक्स्प्रेस वेवर मोठे दिशादर्शक फलक बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या काळामध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती. या ब्लॉक दरम्यान न आयटीएमएस प्रणालीच्या अनुषंगाने ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यात येत आहेत. याच गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले जाणार आहेत.   


मुंबई-पुणे एक्सप्रेसवे देशातील मोठ्या महामार्गांपैकी एक 


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा 148 किमी लांबीचा प्रवास 4-5 तासांवरून 2 तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी अनेक खाजगी वाहनं, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात. 2002 साली बांधून पूर्ण झालेला हा 94.5 किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगानं प्रवास करण्याची ओळख देशवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. 


हे ही वाचा :


पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सीएसएमटीवरील विशेष पॉवर ब्लॉक, प्रगती, डेक्कनसह 'या' ट्रेन्स रद्द, वाचा Timetable