Pune-Mumbai trains : पुण्याहून मुंबईला (Pune- Mumbai Train) कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. रोज हजारो पुणेकर मुंबईला रेल्वेने जात असतात. पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यावरून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 व 11 च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल- एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान भायखळा ते सीएसएमटीदरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आली आहे. ट्रेन 28 ते 31 मेदरम्यान अनेक मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोणत्या ट्रेन रद्द?
- सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस (28 मे ते 2 जून)
- पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (31 मे ते 2 जून)
- नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस ( 1 आणि 2 जून)
- साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (1 आणि 2 जून)
- डेक्कन क्वीन (1 आणि 2 जून)
या गाड्या रद्द असणार आहेत. विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकमध्ये मुंबई-पुणे इंटरसिटी, प्रगती एक्स्प्रेस चार दिवस रद्द राहणार आहे.
काही गाड्या पनवेल, ठाणे स्थानकात रद्द
अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणेपर्यंत चालविण्यात येणार आहे; तर मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच चालविण्यात येणार आहे.
दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या
सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस, सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या दादर; तर सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेलमधून सुटणार आहे.
‘डेक्कन क्वीन’ चा वाढदिवस रद्द
डेक्कन क्वीनचा वाढदिवस दर वर्षी एक जूनला साजरा केला जातो. मुंबई- पुणे प्रवास करणारे प्रवासी मोठ्या उत्साहाच वाढदिवस साजरा करतात. पण यंदा 1 आणि 2 जूनला ‘डेक्कन क्वीन’ रद्द करण्यात आली आहे. ‘डेक्कन क्वीन’चा 97 वा वाढदिवस होणार होता; परंतु गाडी रद्द केल्याने यंदाचा वाढदिवस हुकण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :