एक्स्प्लोर

Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

Mumbai Pune Expressway Missing Link : मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच थांबून फोटो काढणं हे अत्यंत धोकादायक ठरत आहे.

Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर काही प्रवासी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी वाहनं थांबवत असल्याचं समोर आलं आहे. मात्र हा प्रकार आता प्रवाशांना महागात पडणार असून महामार्ग पोलिसांनी यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड लागू शकतो, तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या कारवाईला सामोरं जायचं नसेल तर मिसिंग लिंकवरुन न थांबता सुखकर प्रवास करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे.

मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच थांबून फोटो काढणं हे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.

Missing Link Highway Safety : जीवाशी खेळ, थांबणं धोकादायक

मिसिंग लिंक हा प्रकल्प विशेषतः घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी उभारण्यात आला आहे. अशा ठिकाणी वाहन थांबवणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं ठरत आहे. महामार्ग पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे मिसिंग लिंकवर थांबून सेल्फी किंवा फोटो काढणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल.

Traffic Police Action : दंडासह गुन्हा दाखल होणार

पोलिसांकडून केवळ दंडच नव्हे तर गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हेही नोंदवले जाणार आहेत. सकाळपासून अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. कारवाई टाळायची असेल तर मिसिंग लिंकवर कुठेही न थांबता प्रवास करा, असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे.

Missing Link Highway Project Impact : प्रवासात 30 मिनिटांची बचत

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अलीकडेच सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वळणं आणि कोंडी टाळून प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी झाला आहे. 1 मे रोजी, महाराष्ट्र दिनाच्या निमित्त या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. सुरुवातीला एक मार्ग सुरू करण्यात आला होता, तर आता दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू झाली आहे.

Missing Link Highway Traffic Update : अपघात आणि कोंडीत घट

मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे. पूर्वी दररोज 10 ते 15 अपघात किंवा कोंडीबाबत कॉल येत होते, मात्र आता एकही कॉल नियंत्रण कक्षाला आलेला नाही.

दरम्यान, भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनीही मिसिंग लिंकवर फोटो काढल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करत प्रकल्पाचं कौतुक केलं, मात्र यावरून वाहतूक नियमांच्या पालनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
Mumbai Pune Expressway Accident : मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
मिसिंग लिंकवरील अपघातात काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू; कोण होते तुषार भूमकर?
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget