MPSC Students Protest: मागणीला यश मात्र आंदोलनावर ठाम, आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांला आली भोवळ, उपचारासाठी रूग्णालयात दाखल
MPSC Students Protest Pune: परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. आंदोलनस्थळी एका विद्यार्थ्यांला भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे.
MPSC Students Protest Pune: आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला (MPSC Students Protest Pune) मोठे यश आले आहे. एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी अद्याप आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर आंदोलनस्थळी (MPSC Students Protest Pune) विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपासून उपोषण केलं आहे, त्यापैकी एका विद्यार्थ्यांला भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे.
आंदोलनस्थळी विद्यार्थी आक्रमक झाल्याचं दिसून आलं, त्यावेळी काही उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्याला भोवळ आली, त्यामुळे वैद्यकीय मदत बोलावण्यात आली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी एका विद्यार्थ्याला चक्कर आली आहे. बाकी विद्यार्थ्यांनी त्याला उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थी अद्याप आपल्या मागण्यांनर ठाम आहेत. कृषी विभागाच्या 258 जागांवर परिक्षा घेण्यावर नोटिफिकेशन काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर हा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.
MPSC परीक्षा पुढे ढकलली, मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम
एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल, असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली. मात्र, लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा. या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.
विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाल्यानंतर अभिमन्यू पवार यांची प्रतिक्रिया
भाजप नेते अभिमन्यू पवार यांनी विद्यार्थ्यांची मागणी मान्य झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आयोगाचे मी आभार मानतो. त्यांनी तिसऱ्यांदा परीक्षा मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे. पण काही लोक यामध्येही राजकारण करू पाहत आहेत.शरद पवार हे माझ्या आजोबासारखे आहेत. त्यांना विनंती आहे की, त्यांनी राजकारण करू नये. जे राजकारण करायचे आहे ते विधानसभेत करावं असं अभिमन्यू पवार यांनी म्हटलं आहे तर विद्यार्थांनी अभ्यास करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.