एक्स्प्लोर

Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक

Moshi Building Collapse: छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अडकलेल्या कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी धावून आले आहेत.

Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोतील 'वेस्ट टू एनर्जी' (Waste-to-Energy) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली आहे. या भीषण इमारत दुर्घटनेला (Building Collapse) आता तब्बल 43 तास उलटून गेले आहेत. ढिगाऱ्याखाली अजूनही 8 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, बचावकार्य (Rescue Operation) संथ गतीने सुरू असल्यामुळे घटनास्थळी नातेवाईकांचा तीव्र संताप आणि आक्रोशाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अडकलेल्या कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी धावून आले आहेत. आपल्या कुटुंबातील माणूस सुखरूप बाहेर यावा म्हणून ते डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. मात्र, प्रशासनाकडून अत्यंत ढिसाळपणे आणि संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अनधिकृत बांधकाम पाडताना 50 ते 60 पोकलेन आणणारी महापालिका, इथे माणसांचे जीव वाचवण्यासाठी मात्र केवळ 4 पोकलेन आणि एका क्रेनच्या भरवशावर काम करत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. काल रात्री साडेबारा वाजता एका कामगाराला बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्याने आतमध्ये अडकलेले इतर लोक 'आई-आई' म्हणून ओरडत असल्याचे सांगितले. मात्र, तरीही यंत्रणा तातडीने हलली नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

Moshi Building Collapse: आयुक्तांवर गंभीर आरोप

महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी या घटनेला 'नैसर्गिक आपत्ती' म्हणून हात वर केले आहेत. मात्र, स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. जो कचऱ्याचा डोंगर नियमबाह्य पद्धतीने 180 फुटांपर्यंत वाढू दिला, तो महापालिकेचाच मूर्खपणा होता, असा थेट आरोप केला जात आहे. तसेच, शहरातील कचरा गोळा करणारे ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारीच या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

या गंभीर दुर्घटनेनंतर शहराचे महापौर, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी फिरकून नातेवाईकांची साधी विचारपूसही केली नसल्याने संताप दुणावला आहे. केवळ मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली, परंतु ठोस मदत किंवा वेगवान यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. "एखाद्या नेत्याचा किंवा मंत्र्याचा मुलगा असता, तर यंत्रणा मुंबई-दिल्लीवरून धावली असती, पण गरिबांच्या जिवाची कोणालाच किंमत नाही," अशा शब्दांत नातेवाईकांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

Moshi Building Collapse: हलगर्जीपणामुळे लोकांचा जीव गेला तर...

"माझा भाऊ राहुल गायकवाड आतमध्ये आहे. तो बुधवारी दीड वाजेपासून आतमध्ये आहे. सनी माने, नागेश गायकवाड आणि राहुल गायकवाड हे तिघे देखील आतमध्ये आहेत. काल रात्री जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता देखील आहे, त्यांनी रात्रभर काहीही काम केलेले नाही. आमचे माणसं आतमध्ये जिवंत आहेत की नाही हे देखील आम्हाला माहीत नाही. घरचे आम्हाला सर्वांना सारखे फोन करून विचारत आहेत तेथे काय परिस्थिती आहे. आज काही काम केले नाही, काल काम दिसले पण परवा तेच काम केले असते तर आज माणसं आमच्या इथे उभे असते. या लोकांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा जीव गेला तर हे लोक त्याची जबाबदारी घेणार आहेत का? असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केलाय.  

Moshi Building Collapse: सर्व लोकप्रतिनिधींनी येथे यायला हवे

महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधींनी येथे यायला हवे. तरच ही कामे पटापट होतील. लोकप्रतिनिधी फक्त आले आणि निघून गेले, ते कुठल्या नातेवाईकाला भेटले देखील नाही, काही विचारपूस देखील केलेली नाही. ते येतात दोन शब्द बोलतात आणि निघून जातात, असा आरोप देखील नातेवाईकांना केला.  

Moshi Building Collapse: पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत

हा मानवनिर्मित डोंगर रचण्यात आला होता, ही महापालिकेची चूक आहे. आयुक्त साहेब खोटं बोलत आहेत, मी लहानपणापासून येथील कचऱ्याचा डोंगर पाहत आहे. हा डोंगर फक्त वीस फुटापर्यंत हवा तो 180 फुटापर्यंत गेला होता. 180 फुटाचा डोंगर कोसळल्यामुळे ही बिल्डिंग कोसळली. आयुक्त फक्त जबाबदारी झटकून देत आहेत, त्यांना माणसाशी काहीही घेणं-देणं नाही. त्यांना फक्त आपले पद महत्त्वाचे आहे, काल ते वारकऱ्यांमध्ये जाऊन फुगडी खेळत होते. आम्ही पण वारकरी संप्रदायातले आहोत. सध्याची परिस्थिती त्यांनी समजून घ्यायला हवी, इथला माणूस गेलेला परत येणार नाही. त्यांचे जास्त कर्तव्य कुठे आहे हे त्यांनी ओळखावे. 

Moshi Building Collapse: एखाद्या मंत्र्यांचा मुलगा अडकला असता तर...

महापालिकेचे काम मूर्खपणाचे आहे. आता मंत्र्यांवरच गुन्हा दाखल व्हायला हवा. कंत्राटदाराचे देखील कोणीही माणसं इथे उपलब्ध नाहीत. पालकमंत्री सुनेत्रा पवार देखील इथे आलेल्या नाहीत. ही सर्व चूक महापालिका आयुक्तांची आहे. यात एखाद्या मंत्र्यांचा मुलगा अडकला असता तर मुंबई ते दिल्लीपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी येथे पळत आले असते. मात्र इथे गरिबांचे लोक अडकून पडले आहेत, त्यामुळे येथे कोणीही आलेले नाही," असा संताप नातेवाईकांनी प्रशासनावर व्यक्त केलाय.

Moshi Building Collapse: 'आई... आई... अशी हाक ऐकू येत होती'

"काल रात्री साडेबारा वाजता एकाला बाहेर काढण्यात आले. तो स्वतः सांगत होता की सगळे आतमध्ये आहेत. त्यांना खूप लागले आहे. ते 'आई... आई...' अशी हाक मारत आहेत. पण अजूनपर्यंत या लोकांनी त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत," असे देखील एका नातेवाईकाने सांगितले.

आणखी वाचा 

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत 9 जणांसाठी 'देवदूत' बनून धावले, 14 तासांचा श्वास रोखणारा थरार; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्निशमन दलाच्या जवानांची जीवाची बाजी!

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget