एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला धक्का; रुपाली पाटील यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', राष्ट्रवादीत प्रवेश?

MNS Leader Rupali Thombre Patil Resigned : मनसेला धक्का, माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'.

MNS Leader Rupali Thombre Patil Resigned : मनसेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. परंतु, राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील यांची पुढची भुमिका काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रुपाली पाटील आज  पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. 

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुढील तीन दिवस राज ठाकरे पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, राज ठाकरे पुण्यात येण्याआधीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी त्या राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधू शकतात, अशी सुत्रांची माहिती आहे.  

पाहा व्हिडीओ : मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

मनसेचा पुण्यातील चेहरा म्हणून रुपाली पाटील-ठोंबरे यांची ओळख होती. रुपाली पाटील अनेकदा महिलांचे प्रश्न मांडताना दिसायच्या. तसेच त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून त्या पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्या पक्षात नाराज होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती. अशातच रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान, रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं नमूद केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pune School Reopen : पुण्यात 16 डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु होणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget