Maval Loksabha Constituency : भाजप-अजित पवार गटाचा विरोध डावलून शिंदेंकडून बारणे अप्पांनाच उमेदवारी; ही आहेत 5 कारणे...
मावळमधून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांची लढत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संजोग वाघेरे यांच्याशी होणार आहे. भाजप-अजित पवार गटाचा विरोध डावलून शिंदेंकडून बारणे अप्पांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
मावळ, पुणे : मागील काही दिवसांपासून मावळ लोकसभा मतादरसंघात महायुतीचा (Maval Loksabha Constituency)उमेदवार कोण असेल? आणि उमेदवार नेमका कोणता पक्षाचा असेल?, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली यादी जाहीर झाली आणि मावळमधून श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांची लढत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संजोग वाघेरे (Sanjyog Waghere) यांच्याशी होणार आहे. भाजप-अजित पवार गटाचा विरोध डावलून शिंदेंकडून बारणे अप्पांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
पार्थ पवारांचा दारुण पराभव
श्रीरंग बारणे मागील दोन टर्म ते खासदार राहिले आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पार्थ पवारांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी पार्थ पवारांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे बारणे पुन्हा जिंंकतील, अशी आशा महायुतीला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला!
बारणे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेल्या विद्यमान खासदारांपैकी बारणे यांनी मावळमधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र, सेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झाले. त्यानंतर मावळमधून पुन्हा उमेदवारी देणार असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला आणि उमेदवारी दिली.
...तरीही बारणेंनी आपला डाव साधला!
मात्र श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला महायुतीतील राष्ट्रवादीकडूनच विरोध दर्शवण्यात आला होता. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी विरोध करत बारणे यांनी मावळात राबवलेले एक विकास काम दाखवा, असे म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी बारणेंना विरोध केला होता. निवडणुकीपूर्वी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या. मावळची जागा ही राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र तरीही बारणेंनी आपला डाव साधला आणि उमेदवारी मिळवलीच. आता शेळके बारणेंचा प्रचार करतात का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
भावकी आणि गावकीचं राजकारण!
पिंपरी-चिंचवडमध्ये भावकी आणि गावकीचं राजकारण दिसून येतं. पिंपरी-चिंचवडकर किंवा मावळकर यांना दुसरा उमेदवार दिला तर पराभवाच्या दिशेने जाण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय बारणे हे नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना ते जवळून ओळखतात. त्यांच्या समस्या जाणतात. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना
श्रीरंग बारणेंची लढाई शिवसैनिकाविरोधातच असणार आहे. एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून बारणे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेतून संज्योग वाघेरे उमेदवार आहेत. शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी लढाई मावळमध्ये पाहायला मिळणार आहे.
इतर महत्वाची बातमी-