विवाह संकेतस्थळावरून लग्नाची मागणी करत फसवणूक, बारामतीच्या शासकीय रुग्णालयातील स्विपरला अटक
Marriage Websites : मला आई वडील नाहीत, मी एकटाच आहे. मी सरकारी नोकरीला असून अविवाहित आहे. अशी बतावणी करून शादी डॉट कॉम वरील अनेक मुलींना एका तरुणाने भुरळ पाडली.
Marriage Websites : मला आई वडील नाहीत, मी एकटाच आहे. मी सरकारी नोकरीला असून अविवाहित आहे. अशी बतावणी करून शादी डॉट कॉम वरील अनेक मुलींना एका तरुणाने भुरळ पाडली. मुलींना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्तापीत केले, तसेच पैसेही लुबाडले. विवाह संकेतस्थळावरून फसवणूक करणाऱ्या सराईताला बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत भोर येथून अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजयकुमार नंदकुमार चटौला रुई रुग्णालय शासकिय वसाहत बारामती असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे आहे. याबाबत मुंबई येथील एका 39 वर्षीय महिलेने लग्न संकेत स्थळावरून आरोपी अजयकुमार चटौला याने लग्नाचे आमिष दाखवत आपली पैशाची फसवणूक करून २१ डिसेंबर २०२१ रोजी बलात्कार व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपी अजयकुमार चटौला हा बारामती येथील रुई शासकीय रुग्णालयात स्विपर म्हणून कार्यरत आहे. तो विवाहित असून देखील शादी डॉट कॉमवर मुलींना रेक्वेस्ट टाकून सरकारी नोकरदार असल्याचे सांगून त्यांच्याशी मैत्री करून लग्नाचे आमिष देत आपल्या जाळ्यात ओढून जवळीक साधायचा. त्यानंतर मुलींच्या घरच्यांना भेटून विश्वास संपादन करून मुलीला सोबत घेऊन फिरायला घेऊन जात होता. त्यानंतर मुलीशी शारीरिक सबंध प्रस्तापीत करून पैशांची गरज असल्याचे सांगून पैसे लुबाड्त असल्याचा प्रकार बारामती तालुका पोलिसांनी तपासात समोर आणला आहे.
मुंबईच्या महिलेच्या फसवणुकी नंतर आरोपी चटौला हा पुण्यातील दुसऱ्या मुलीसोबत नेहमीप्रमाणे खोटे बहाने करून तिला पळवून आणून भोर येथील एका रूमवर रहात असल्याची माहिती बारामती पोलिसांना मिळाली होती. पोलीस भोर येथे आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. त्यानुसार अखेर बारामती तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळया आहेत. यावेळी त्या मुलीला आरोपी चटौला मुलींची फसवणूक करत असल्याची हकीकत सांगून पुढील होणाऱ्या फसवणुकीला बळी पडण्यापासुन वाचवून मुलीची सुटका करत घरी जाण्याचा सल्ला दिला. यावेळी त्या मुलीकडून देखील गरज असल्याचे सांगून दीड लाख घेतले असल्याची माहिती पोलिसांना दिली.
आरोपी विवाहित असूनही तो शादी डॉट कॉम वरून मुलीना लग्नाचे आमिष दाखवून बारामती येथील रुई रुग्णालयाच्या शसकिय वसाहतीसह वेगवेगळया ठिकाणी शारिरीक संबंध प्रस्तापित करून १३ हजार रुपये घेऊन गंडा घातला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. बारामती पोलीस अधिक तपास करीत आहेत.