काळे कपडे घालू नका ! मराठा आरक्षण आंदोलनाची धग वर्ल्डकप सामन्यात? पुण्यातील वर्ल्डकप सामन्यांत प्रेक्षकांना काळे कपडे परिधान करण्यास मज्जाव
पुण्यातील वर्ल्डकप सामन्यांत प्रेक्षकांना काळे कपडे परिधान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे.
![काळे कपडे घालू नका ! मराठा आरक्षण आंदोलनाची धग वर्ल्डकप सामन्यात? पुण्यातील वर्ल्डकप सामन्यांत प्रेक्षकांना काळे कपडे परिधान करण्यास मज्जाव maratha reservation wearing black clothes banned at World Cup matches in Pune काळे कपडे घालू नका ! मराठा आरक्षण आंदोलनाची धग वर्ल्डकप सामन्यात? पुण्यातील वर्ल्डकप सामन्यांत प्रेक्षकांना काळे कपडे परिधान करण्यास मज्जाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/30/665c9d1b86f4f1a29d97bc7a64b362c51698661688827442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पुण्यातील क्रिकेट वर्ल्डकप( ODI World Cup 2023) सामन्यात मराठा आंदोलनाचे पडसाद (PUNE ODI) उमटत आहेत. आजच्या श्रीलंका (Shrilanka) विरुद्ध अफगाणिस्तान (Afganistan) सामना पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक काळे कपडे परिधान करून आलेत. पण अशा प्रेक्षकांना पोलीस आणि यंत्रणांनी प्रवेश नाकारला. मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद वर्ल्डकप सामन्यात उमटू नयेत, कोणी काळे कपडे दाखवून याचा निषेध करू नये. म्हणून यंत्रणांनी ही खबरदारी घेतलेली आहे.
काळे कपडे परिधान केलेल्या प्रेक्षकांना पोलीस आणि यंत्रणेकडून मराठा आंदोलनाचे कारण सांगितले जात आहे. त्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या क्रीडा प्रेमींचा हिरमोड झालेला आहे. यंत्रणांनी पूर्वकल्पना न दिल्यानं प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात यानंतर आणखी तीन सामने होणार आहेत, मराठा आरक्षणाचा तोडगा निघाला नाही. तर त्यावेळी प्रेक्षकांना याच परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
प्रेक्षकांकडून पोलिसांना काळ्याकपड्यांसदर्भात प्रश्न विचारले जात आहे. मात्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असून कोणीही काळे कपडे घालून घोषणाबाजी करु नये किंवा या वर्ल्डकपमध्ये कोणतीही बाधा निर्माण होऊ नये, यासाठी काळे कपडे घालण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचं पोलिसांनी प्रेक्षकांना सांगितलं आहे. पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचं आम्ही पालन करणार मात्र त्यांनीदेखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासाठी जलसमाधी
एकीकडे काळ्या कपड्यांसाठी मज्जाव केला जात आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आलं आहे. पुण्यातील कार्ला येथील तलावात पाच मराठा बांधव उतरले होते. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी असा पवित्रा घेतला. मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण न दिल्यास येणाऱ्या काळात आणखी आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाचे लढ्याचे पडसाद बारामतीत उमटले असून आज एसटी बस स्थानकावर मराठा मोर्चा क्रांतीच्या उभ्या असणाऱ्या एसटी बसेसवर राज्य सरकारने जाहिराती केल्या होत्या. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)