एक्स्प्लोर

मोठी बातमी: राज्य मागासवर्ग आयोगावरुन सदस्य चंद्रलाल मेश्राम यांची उचलबांगडी, मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेवरुन वाद

Maratha Reservation: यापूर्वीचे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यासह अनेक सदस्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. आयोगाच्या कार्यपद्धतीवरुन वाद

पुणे: मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वेक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांची आयोगातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप शुक्रे यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने मेश्राम यांना आयोगातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरात करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणानंतर अहवाल सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी चंद्रलाल मेश्राम यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, याबाबत आपल्याला अद्याप कोणताही अधिकृत आदेश मिळाला नसल्याचे मेश्राम यांनी सांगितले.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्यांचे तडकाफडकी राजीनामे

यापूर्वीचे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्यासह अनेक सदस्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. आयोगाच्या कामात सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत माजी अध्यक्ष निरगुडे यांनी आयोगाचा राजीनामा दिला होता. तत्पूर्वी  राज्य मागासवर्ग आयोगातील बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर या सदस्यांनीही सरकारी हस्तक्षेपाचे कारण देत राजीनामे दिले होते. यानंतर राज्य सरकारने माजी न्यायमूर्ती संदीप शुक्रे यांची राज्य मागासवर्ग आयोगाचे म्हणून नियुक्ती केली होती.

चंद्रलाल मेश्राम काय म्हणाले?

चंद्रलाल मेश्राम यांनी यासंदर्भात 'एबीपी माझा'शी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मला अद्याप राज्य मागासवर्ग आयोगातून काढून टाकल्याच्या आदेशाची कोणतीही प्रत मिळालेली नाही. ही प्रत मिळाल्यानंतर मी पुढची भूमिका ठरवेन. मला आतापर्यंत काहीही कळालेले नाही. मी यासंदर्भात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संदीप शुक्रे यांची भेट घेईन. राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून आयोगाचा सदस्य म्हणून मी आतापर्यंतची सगळी जबाबदारी पार पाडली आहे. मध्यंतरी मला एक नोटीस आली होती. मी बैठकांना गैरहजर राहत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले होते. मी त्या नोटीसला उत्तर देताना मी बैठकांना कितीवेळा हजर होतो, याच्या नोंदी पाठवल्या. मराठा सर्वेक्षणानंतर माझी जी काही भूमिका असेल ती मी अहवालात मांडेन, असेही चंद्रलाल मेश्राम यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

मराठा आरक्षण निर्णयानंतर आता एकनाथ शिंदेच स्ट्राँग मराठा लीडर, इतर लीडरशीप बाद: प्रकाश आंबेडकर

गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल मराठा आरक्षण मिळवून देणार का?

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget