एक्स्प्लोर

चाकण पेटवणाऱ्या 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा, आंदोलनात बाहेरचे घुसल्याचा संशय

हिंसाचार करणाऱ्यांची ओळख स्थानिकांच्या मदतीने पटवून आज अटकसत्र सुरु करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं.

पुणे: पुण्यातल्या चाकणमध्ये सोमवारी मराठा आंदोलनाच्या बंद दरम्यान जाळपोळीप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे चाकणमधली जाळपोळ ही स्थानिकांनी नव्हे तर बाहेरुन आलेल्या लोकांनी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. असंख्य बसेस आणि खासगी वाहनांची काल तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. जमाव जमवणे, दंगल घडवणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवला आहे. काही नावं निष्पन्न झाली असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे इतर नावं निष्पन्न करण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख स्थानिकांच्या मदतीने पटवून आज अटकसत्र सुरु करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. स्पेशल रिपोर्ट : पुणे : मराठा आंदोलकांच्या उद्रेकाने चाकण दिवसभर धुमसलं  पुणे-नाशिक हायवेवर जवळपास 30 बस आणि ट्रकची जाळपोळ केली. तर शंभरहून अधिक गाड्यांची तोडफोड केली. चाकणजवळ काल सकाली दहाच्या सुमारास आंदोलन सुरु होतं. आधी दोन तास आंदोलन शांततेत सुरु होतं, त्यानंतर तोडफोडीला सुरुवात झाली. त्यामुळे या आंदोलनात बाहेरचे लोक घुसल्याचा संशय आहे. चाकण कोणी पेटवलं? चाकण येथील मराठा क्रांती मोर्चा नेमका कोणामुळं हिंसक झाला, यासाठी पोलिसांनी व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ जमवण्यास सुरुवात केली आहे. या फोटो आणि व्हिडीओचा आधार घेत कारवाई केली जाणार आहे. यासाठी दोन पोलीस निरीक्षकांचे नंबर देण्यात आले असून, व्हाट्सअपवर व्हिडीओ पाठवणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. चाकणमध्ये आंदोलकांनी पंचवीस ते तीस बसेस जाळल्या. तसंच अनेक वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. काल चाकण, देवाची आळंदी आणि खेडमध्ये बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरून जाणाऱ्या अनेक गाड्या यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. नाशिक, औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर सोलापूर, कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. संबंधित बातम्या   आजपर्यंत मला कोणी जात विचारली नाही, माझी जात....: नाना पाटेकर    5 संस्था आज मराठा समाजाबाबतचे अहवाल मागासवर्ग आयोगाला देणार    पुणे : कोण तयार करतंय मागासवर्ग आयोगाचा अहवाल?  

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Pune Crime News : पुण्यात कथित अध्यात्मिक गुरुचं धक्कादायक कृत्य, तरुणीला भीती घालून मागवले अर्धनग्न फोटो, शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं सांगितलं अन्...
पुण्यात कथित अध्यात्मिक गुरुचं धक्कादायक कृत्य, तरुणीला भीती घालून मागवले अर्धनग्न फोटो, शरीरात नकारात्मक ऊर्जा असल्याचं सांगितलं अन्...
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget