एक्स्प्लोर

मेधा खोलेंविरोधात मराठा क्रांती मोर्चाची निदर्शने

मेधा खोलेंनी मराठा महिलेविरोधात केलेल्या जातीवाचक व्यवहाराचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

पुणे:  हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पुणे वेधशाळेच्या कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी मेधा खोले यांच्याविरोधात शेतकरी कामकार पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शनं केली. मेधा खोलेंनी मराठा महिलेविरोधात केलेल्या जातीवाचक व्यवहाराचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान या प्रकारामुळे आयएमडी कार्यालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून मेधा खोले यांनी पोलिसात तक्रार केली आहे. काय आहे प्रकरण? मेधा खोले यांना गौरी-गणपतीदरम्यान सोवळ्यातील स्वयंपाक करणारी सुवासिनी ब्राम्हण महिला हवी होती. 2016 मध्ये निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री त्यांच्याकडे आली. आपल्याला कामाची गरज असल्याचं सांगत त्यांनी खोले यांच्याकडे स्वयंपाकाचं काम मागितलं. त्यावेळी खोले यांनी निर्मला यांच्या घरी जाऊन ही महिला ब्राम्हण आहे की, नाही याची चौकशी केली. त्यानंतर त्यांनी तिला स्वयंपाकाचं काम दिलं. नुकताच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही निर्मला यांनीच मेधा खोले यांच्या घरी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. पण काल (बुधवार) निर्मला ही ब्राम्हण नसल्याची माहिती खोले यांना समजली. त्यामुळे पुन्हा शाहनिशा करण्यासाठी खोले या निर्मला यांच्या घरी गेल्या. त्यावेळी आपलं नाव निर्मला यादव असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोघींमध्ये बराच वाद झाला. यावेळी आपल्याला महिलेनं दमदाटी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मेधा खोले यांनी सिंहगड पोलिसात केली आहे. संबंधित बातम्या सोवळं मोडल्यानं स्वंयपाकी महिलेवर गुन्हा, पुण्यातील धक्कादायक प्रकार

BLOG: खोलेबाईंचे विचार किती खोल खोल खोल

महत्त्वाच्या बातम्या

कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 
कर्जत परिसरातील वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंची टीका, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाल्या, मी बॉटनी ऑनर्स 
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
Pune Crime News: पुण्यात भयंकर घटना, गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; शरीरावर 700 टाके, एक हात अन् 3 बोटं तुटली, राजगुरुनगर हादरलं
पुण्यात भयंकर घटना, गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; शरीरावर 700 टाके, एक हात अन् 3 बोटं तुटली, राजगुरुनगर हादरलं

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget