(Source: Poll of Polls)
Manoj Jarange: छगन भुजबळांना आता माझा व्यक्ती म्हणूनही विरोध असेल, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मराठा आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी देण्याचं साकडं घातलं. त्यानंतर आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सरकारला सद्बुद्धी मिळो असं साकडं जरांगेंनी या वेळी घातले.
पुणे: छगन भुजबळांसोबत (Chhagan Bhujbal) माझे काही वाद होते पण व्यक्ती म्हणून कधीच विरोध नव्हता. मात्र आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे. म्हातारं माणूस आहे, म्हणून मी काही बोलत नाही. पण मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) विरोध केला तर मग मात्र काय खरं नाही, असे म्हणत मरठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेचं देहू, आळंदीत जंगी स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर सरकारला महाराजांच्या ओवींची आठवण करून दिली. सरकारला सद्बुद्धी मिळो असं साकडं जरांगेंनी या वेळी घातले.
जरांगे म्हणाले, माऊली हे सर्वांना आशीर्वाद देऊन अनेकांचे संसार वसवतात. आरक्षणासाठीही त्यांनी आशीर्वाद दिला आहे.वारकरी संप्रदाय देखील आरक्षणासाठी पुढे येत आहे. जो संप्रदाय आजतागायत अशा गोष्टीत पडत नव्हता मात्र अनेक महंतांनी यावर भाष्य केलंय.अगदी देवाने ही आपल्याला कौल दिलाय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांना ही त्रास दिला गेला आह. तुम्ही ही थोडा त्रास सहन करा.
आरक्षण मिळावं यासाठी लढा देतोय, पण याला विरोध होतोय : मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, 40 वर्षांपासून मराठ्यांनी संघर्ष करायचा. माझं लेकरू अधिकारी बनेल अन् माझं कष्ट कमी होईल असं मराठा समजायचा. पण राज्यात षडयंत्र रचलं गेलं आणि ते स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. मराठ्यांच्या पाठीत मागून विश्वासघाताचे वार होत होते, मात्र याची कल्पना नव्हती. मराठ्यांमुळं जे मोठे झाले, ते कधीच मराठ्यांच्या मदतीला धावून आले नाहीत. मराठ्यांची मुलं शेतातच राहिली, आरक्षण नसल्यानं ही मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करू शकली नाहीत. लेकरू अधिकारी होत नसल्यानं आई-बाप चिंतेत असतात. मुलांनी नेमकं काय पाप केलं हेच कळेना. म्हणूनच आम्ही आरक्षण मिळावं यासाठी लढा देतोय, पण याला विरोध होतोय.
आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही : मनोज जरांगे
ज्या कायद्यात मराठ्यांचे हित नसेल तो कायदा आम्हाला मान्य नाही. हे आंदोलन सरकारशी समेट घालायला नाही तर मराठ्यांना न्याय देण्यासाठी आहे. 24 डिसेंबर ही तारीख आपण सरकारला दिलेली नाही, ही त्यांनी आपल्याकडून मागून घेतलेली आहे. त्यामुळं आरक्षण देण्याचं काम त्यांचं आहे. त्यामुळं आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. ते आपण घेऊनच राहणार, असे जरांगे म्हणाले.
हे ही वाचा: