TET Exam Scam: मोठी बातमी! 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र; विद्यार्थ्यांवर कशी होणार कारवाई?
विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत असतील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खासजी शाळामध्ये शिकवत असतील तर शिक्षण अधिकारी कारवाई करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं आहे.
TET Exam Scam: 2019 साली झालेल्या टी. ई. टी. अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होतं. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईदेखील होणार आहे.
कारवाई कशी होणार?
या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. हे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असतील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खासगी शाळांमध्ये शिकवत असतील तर शिक्षण अधिकारी कारवाई करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं आहे.
7800 विद्यार्थ्यांचं प्रमाणपत्र रद्द करणार
या 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना इथुन पुढे शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या 7800 विद्यार्थ्यांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. 2019 ला 16 हजार 705 विद्यार्थ्यांनी टी ई टी परिक्षा दिली होती.त्यापैकी 7800 विद्यार्थ्यां पैसै देऊन परिक्षा पास झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणार्या शिक्षकांचं धाबं दणाणलं आहे.
शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार
2013 पासून शिक्षक पात्रता परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सगळ्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. 2019 प्रमाणेच 2018 साली घेण्यात आलेल्या टी ई टी परिक्षेत देखील गैरव्यवहार झाल्याच उघड झालं असून त्याचा तपासही पुणे सायबर पोलीस करत आहेत.
2018 चे उमेदवार अपात्र ठरवण्याची शक्यता
टी ई टी घोटाळ्यात पोलीसांनी शिक्षण परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव ढेरे यांच्यासह टी ई टी परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी. ए. टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख यांच्यासह अनेकांना अटक केली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करताना पुणे सायबर पोलीसांना म्हाडा परिक्षेचा पेपर फुटल्याच समजलं होतं. तर म्हाडाच्या पेपरफुटीचा तपास करताना टी. ई. टी. परिक्षेत गैरव्यवहार झाल्याच समोर आलं होतं. 2018 सालच्या परिक्षेत देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात उमेदवार अपात्र ठरविण्यात येण्याची शक्यता आहे.
TET Exam Scam : टीईटी घोटाळ्याचा आवाका मोठा! 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र, कारवाईचे आदेश