एक्स्प्लोर

Maharashtra Coronavirus: कोरोना रुग्णांसाठी एचआरसिटी रिपोर्ट अधिक महत्वाचा ठरतोय! डॉक्टरांची माहिती

कोरोना बाधित रुग्णांसाठी एचआरसिटी रिपोर्ट अधिक महत्वाचा ठरत असल्याचे काही उदाहरणांवरुन समोर आलं आहे.

पिंपरी चिंचवड : दुसऱ्या लाटेत कोरोनाचे गंभीर रुग्ण आढळत असल्याचं अनेकदा समोर आलंय. लक्षणं दिसूनही ती अंगावर काढल्याने अशी परिस्थिती उद्भवत आहे. ही बाब अनेकांच्या जीवावर देखील बेतलेली आहे. आता तुम्हाला अशी वेळ येऊन द्यायची नसेल तर वेळीच एचआरसिटीचा पर्याय अवलंबणे गरजेचे आहे. तेव्हाच पुढचा धोका टळू शकतोय.

64 वर्षांचे कोरोना बाधित भाऊसाहेब डमरे आज ठणठणीत आहेत. पण अवघ्या आठवड्यापूर्वी त्यांची तब्येत खालावलेली होती. चालणं ही शक्य नव्हतं. केवळ आणि केवळ एचआरसिटी मुळं हे शक्य झाल्याचं नातेवाईक सांगतायेत. कारण कोरोनाची लक्षणं जाणवत असताना आधी अँटीजेन आणि मग आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. पण त्रास कमी होतच नव्हता, शेवटी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी एचआरसिटीचा सल्ला दिला. 25 पैकी 16 स्कोर आल्याने ते पॉझिटिव्ह असल्याचं आणि परिस्थिती गंभीर असल्याचं निष्पन्न झालं. पण एचआरसिटीच्या या निर्णयामुळे तातडीचे उपचार मिळाले आणि आज आजोबा ठणठणीत बरे होऊ लागलेत. 

कोरोनाची लक्षणं जाणवत असताना अनेकजण भितीपोटी चाचणी करणं टाळतात. त्यातून ही चाचणी केली आणि लागण झाल्याचं समजलं तर अनेकांकडून घरीच उपचार घेण्याचं ठरवलं जातं. हीच बाब 45 वर्षांवरील रुग्णांच्या जीवावर बेतणारी ठरते. आता हा धोका उद्भवू द्यायचा नसेल तर एचआरसिटीचा पर्याय अवलंबणे अधिक गरजेचं आहे.

एचआरसिटी म्हणजे काय?
एचआरसिटी म्हणजे हाय रिझोल्युशन कॉम्पुटेड टोमोग्राफीचा (High-resolution computed tomography) रिपोर्ट हा रुग्णाच्या छातीत निमोनिया किती पसरला आहे, हे दर्शवतो. वैद्यकीय भाषेत त्याला स्कोर असं म्हणतात. 

  • 1 ते 8 दरम्यान स्कोर असेल तर घरीच उपचार घेतले तरी चालतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन महत्वाचे असते.
  • 9 ते 10 दरम्यान स्कोर असेल तर डॉक्टरांच्या निगराणी खाली असावे.
  • 11 ते 16 दरम्यान स्कोर असल्यास ऑक्सिजन अथवा आयसीयू बेडवर उपचार घ्यावे.
  • 17 ते 25 दरम्यान स्कोर असणं हे रुग्णांसाठी धोक्याचं असतं, यासाठी व्हेंटिलेटर बेडची गरज भासते. अशी माहिती वायसीएम रुग्णालयतील डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Neelam Gorhe | नीलम गोऱ्हेंनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं- शरद पवारSharad Pawar on Sanjay Raut | मी कुणाचा सत्कार करावा याची परवानगी घ्यावी लागेल का?CM Devendra Fadnavis PC :साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी टोचले कानAdv Anjali Dighole On Manikrao Kokate : हस्तक्षेप याचिका दाखल करणार :अंजली दिघोळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
Amol Mitkari: 'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
Ambadas Danve : शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
भारत-पाकिस्तान मॅच, राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या भंगारव्यवसायिकावर पालिकेचा जेसीबी; निलेश राणेंकडून इशारा
भारत-पाकिस्तान मॅच, राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या भंगारव्यवसायिकावर पालिकेचा जेसीबी; निलेश राणेंकडून इशारा
उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत, गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या
उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत, गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या
Embed widget