पुणे : महादेव बेटिंग अॅप प्रकरणी (Mahadev Book App) पुण्यातील नारायणगावमध्ये पोलीसांनी छापेमारी केली आहे. परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची कामं पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची नारायणगाव (Narayangaon) येथे छापेमारी केलीय. नारायणगावातील एका इमारतीत या काम सुरू असून या प्रकरणात  70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.  


परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपची पायामुळं पुण्याच्या नारायणगावमध्ये सुरु होती. नारायणगाव शहरातील एका इमारतीत  काम सुरु होते. संपूर्ण इमारत महादेव अॅपसाठी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती  समोर आली आहे.  नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरु आहे.


महादेव बुक अॅपवर बंदी  


अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीच्या (ED) विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपवर (Mahadev Betting App) बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  महादेव बुक अॅपवर बंदी घातली आहे. या अगोदर महादेव बेटींग अॅप प्रकरणात अनेक कलाकारांची नावे देखील नावं पुढे आली होती. त्यातच आता मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी सुरु असल्यामुळे केंद्र सरकारकडून ही मोठी कारवाई करण्यात आलीये. 


अॅप प्रकरणी दररोज नवी माहिती समोर


महादेव बुक अॅप प्रकरणाच्या तपासादरम्यान, ईडीला दररोज नवी माहिती मिळत आहे. या संदर्भात ईडीनं अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावलं आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासही सांगितलं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपींनी महादेव बुक अॅप आणि त्याच्याशी संबंधित इतर अॅप्लिकेशन्सद्वारे कमावलेल्या कोट्यवधी रुपयांचा वापर करून अमाप मालमत्ता खरेदी केल्याचं उघड झालं आहे.


शाही लग्न सोहळ्यामुळे मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड 


 महादेव बुक अॅपचा संस्थापक सौरभ चंद्राकरने (Saurabh Chandrakar)  मित्र रवी उप्पलसोबत 'महादेव ऑनलाईन अॅप' सुरू केलं होतं.   या अॅपवर ऑनलाईन बेटिंग केली जाते. सौरभ चंद्रकारचा फेब्रुवारी 2023 मध्ये, संयुक्त अरब अमिरातीमध्ये  शाही विवाहसोहळा पार पडला. त्याच्या शाही विवाह सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी आले होते. या लग्नाच्या शाही थाटामुळे आणि खर्चामुळे हे लग्न ईडीच्या निशाण्यावर आलं आणि त्यानंतर मनी लॉन्ड्रिंगचं सर्वात मोठं नेटवर्क उघड झाले.


हे ही वाचा :


नांदेड पाठोपाठ अकोल्यातही आयकर विभागाची छापेमारी; अशोकराज आंगडीया कुरियर सर्व्हिसचा भंडारी फायनान्सशी संबंध?