Akola News अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागाकडून (Income Tax Department) अनेक ठिकाणी कारवायांचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी नांदेडमध्ये (Nanded News) आयकर विभागाकडून एक मोठी कारवाई केली. या कारवाई कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती आयकर विभागाच्या हाती लागलीय. या कारवाईत तपासाचे धागेदोरे आणखी उलगडत असताना नवनवीन माहिती हाती येऊ लागली आहे.
अशातच आज अकोल्यातल्या (Akola News) कोठडी बाजारातील अशोकराज आंगडीया कुरियर सर्व्हिसवर देखील आयकर विभागाने धाड टाकली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्या पथकाकडून कुरियरच्या कार्यालयात तपासणी केल्या जात आहे.
नांदेड पाठोपाठ अकोल्यातही आयकर विभागाची छापेमारी
अशोकराज आंगडीया कुरियरवरील तपासणीचं नांदेडमध्ये झालेल्या आयकर धाडीशी कनेक्शन असल्याची प्रथमिक माहिती पुढे येऊ लागली आहे. कुरियरच्या माध्यमातून मोठ्या रकमांचा व्यवहार झाल्याचा आयकर विभागाला संशय आहे. त्यामुळेच ही तपासणी मोहीम सुरू असल्याचे समजते आहे. या धाडीबाबत मोठी गोपनियता ठेवली असल्याने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलेलं नाहीये.
मात्र, अचानक आज या धाडीच्या बातमीने सध्या अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच आयकर विभागाकडून आणखी काही कुरियर कंपन्यांवर धाडीची शक्यताही वर्तवल्या जात आहे. तसेच या तपासाणी मोहीममुळे नांदेडच्या त्या कारवाईशी संबंधित काही धागेदारे उलगडणार का? असा प्रश्नही या निमित्याने उपस्थित होतो आहे.
नांदेडच्या भंडारी फायनान्सशी संबंध?
दरम्यान, नांदेडमध्ये असलेल्या संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता अकोल्यात आयकर विभागाकडून अकोल्यातल्या कोठडी बाजारातील अशोकराज आंगडीया कुरियर सर्व्हिसवर धाडी टाकत तपासणी केल्या जात आहे. आज सकाळपासून अतिशय गोपनीय पद्धतीने कोठडी बाजारातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आंगडीया कुरियर सर्व्हिसवर कार्यालयावर ही तपासणी मोहीम सुरू आहे. आयकर विभागाचे वाहने देखील रस्त्यावर उभे आहे. आयकर विभागाच्या या कारवाईन अकोला शहरात अनेक व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणालाले आहेत. आता या कारवाईत आणखी कोणती नवी माहिती हाती येते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाची मोठी कारवाई!
नांदेडमध्ये असलेल्या संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने (Income Tax Department) छापा टाकत मोठी कारवाई केली. आयकर विभागाने शुक्रवारी केलेल्या या छापेमारीत 170 कोटीची बेहिशोभी मालामत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात आता 14 कोटी रुपये रोख, तर 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 14 कोटीची रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 14 तास लागल्याचे बोलले जात आहे. तर या कारवाईत काही महत्वपूर्ण दस्तावेज सुद्धा आयकर विभागाच्या हाती लागले आहे.
आयकर विभागाची हि कारवाई गेल्या 72 तासापासून सुरु असून अद्याप पोलीस आणि आयकर विभाग पुढील तपास करत आहेत. या घटनेने सध्या नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच या तपासाचे धागेदारे आणखी उलगडत असताना नवनवीन माहिती हाती लागत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या