एक्स्प्लोर

Pune-Lonavala News: पावसाळ्यात लोणावळ्याला जायचं नियोजन करताय? मग ही बातमी नक्की वाचा

लोणावळ्यात संध्याकाळी पाचनंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे. शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. परिणामी भुशी धरणाने रौद्र रूप धारण केलंय.

Pune-Lonavala News: लोणावळ्यात संध्याकाळी पाचनंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे. शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे भुशी धरणाने रौद्र रूप धारण केलंय. त्यामुळं पर्यटकांना धरणाच्या बाजूला उभ राहून इथला आनंद घ्यावा लागत आहे. भुशी धरण इतकं ओसंडून वाहतंय की पायऱ्या ही दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही लोणावळ्याला जायचा बेत आखत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे.

लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरूच आहे.  दहा तासांतच 125 मिलिमिटर इतका पाऊस कोसळलाय. काल सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंतची ही आकडेवारी आहे. गेल्या सात दिवसांत धो धो बरसत पावसाने तब्बल 1077 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो होण्याची वाट बघत असतात. पुरेसा पाऊस झाला की भुशी धरण ओव्हर फ्लो होतं. यावर्षी जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे पर्यटक लोणावळ्यात पर्यटक गर्दी करत आहेत. दोन दिवसांपुर्वी लोणावळ्यातील भुशी धरणात पाय घसरुन एक पर्यटक वाहत गेला होता.24 तासांनंतर सुरक्षा पथकाला त्याचा मृतदेह सापडला होता. हे अपघात टाळण्यासाठी पाचनंतर बंद ठेवण्याचा निर्यण घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या आणि अपघाताच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला देखील 16 जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवा अशी विनंती वनविभागाकडून जिल्हाप्रशासनाला केली जात आहे.

पुण्यासह राज्यभरात सध्या जोरदार पाऊस पडतो आहे. अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शहरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे शेजारच्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणतीही जीवित हानी होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र नागरिकांनी देखील सावधान राहण्याची गरज आहे.

खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने पुण्याच्या मुठा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परवाच्या (10जुलै) मध्यरात्रीपासून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात केली आहे. पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याने पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Embed widget