पुणे :  पोलिसांच्या कोठडीतून ससून रुग्णालयात उपचारासाठी  दाखल झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) पलायन प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झाला आहे. ललित पाटील हा पोलीस कोठडीत असताना त्याला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याच वेळी त्याने अभिषेक बलकवडे याची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फूटेज सप्टेंबर महिन्यातील आहे.  या सीसीटीव्हीमुळे पुणे पोलिसांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 


ललित पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांची भेट होत असल्याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.  ललित पाटील हा कुख्यात ड्रग्स तस्कर तर अभिषेक बलकवडे हा ललितचा साथीदार आहे. हे दोघे ही इमारतीच्या आवारात भेटल्याचा सीसीटीव्ही  फूटेज समोर आले आहे. अभिषेक बलकवडे सध्या पोलीस कोठडीत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणाऱ्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह राजकीय व्यक्तींचाही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. त्यातच हे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्याने आता पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे राहिले आहे. 


दरम्यान, याआधी देखील ललित पाटीलचा एक सीसीटीव्ही फूटेज समोर आला होता. ललित पाटीलच्या मागे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला होता. ललित ससूनमधून ज्या हॉटेलमध्ये पोहचला त्याच हॉटेलमध्ये अवघ्या एका तासात पोलीस कर्मचारी देखील पोहचला. ज्या पोलीस कर्मचारी काळे यांच्या हाताला झटका देऊन ललित पळाला असं सांगितलं गेलं तेच काळे अवघ्या एका तासात हॉटेलमध्ये कसे आले, असा प्रश्न उपस्थित विचारला जाऊ लागला आहे.  हॉटेलमधील cctv समोर आल्याने पोलीस कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. 


ससून चौकशी समिती म्हणजे फार्स; आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप


ससून चौकशी समिती म्हणजे फार्स असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. ड्रग तस्कर ललित पाटील ससूनमधून पळून गेल्यानंतर ससूनच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांनी राज्य सरकारकडून या प्रकरणात ससूनच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला.  मात्र चौकशीसाठी ससूनच्या डीनच्या समकक्ष आधिकारीच नियुक्त केल्याने तो आपल्या सहकर्याची चौकशी कशी करणार असा प्रश्न आमदार धंगेकरांनी उपस्थित केलाय. या प्रकरणाची निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली.


ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील ने  पलायन केल्यानंतर ससून रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला.देशभरात या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशी साठी समिती गठित केली आहे.परंतु ही समिती हा केवळ चौकशीचा फार्स असून या मधून काहीही साध्य होणार नाही असे धंगेकर यांनी मुखमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.हे अतिशय गंभीर प्रकरण असून या मध्ये अनेक बडे मासे गुतले आहेत.ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या आशीर्वादाने ललित पाटील अनेक दिवस ससून रुग्णालयाचा पाहुंचार घेत होता.या ठिकाणहून तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता.त्यामुळे या प्रकरणात दोषी डॉक्टरावर ही चौकशी समिती कारवाई करू शकणार नाही.त्किंबहुना या डॉक्टरांना वाचवण्याचे काम ही समिती करू शकते.त्यामुळे हा प्रकरणाच्या चौकशी साठी निवृत्त न्यायाधिशच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करावी अशी मागणी धंगेकर यांनी मुखमंत्र्याकडे केली आहे. 



Pune Drugs CCTV : कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडेचं CCTV दृश्य